• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sharad pawar s empire is spread in these areas of maharashtra he has invested the biggest amount in shares spl

PHOTOS : मविआचे बडे नेते शरद पवार यांची संपत्ती किती? ‘इथे’ केलीय सर्वाधिक गुंतवणूक, वाचा मालमत्तेची माहिती

Sharad Pawar s empire, Net Worth, Property and Investment : शरद पवार महाराष्ट्रासह देशातील एक बडे दिग्गज राजकीय नेते आहेत. त्यांच्याकडे आजघडीला कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आहे. अनेक जमिनींचे ते मालक आहेत. त्यांनी त्यांच्या पैशांची सर्वाधिक गुंतवणूक शेअर बाजारात केलेली आहे.

Updated: July 22, 2024 12:24 IST
Follow Us
  • Sharad Pawar News
    1/10

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील भाजपाच्या महाराष्ट्र अधिवेशनात विरोधकांवर जोरदार हल्ला चढवताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशातील भ्रष्टाच्यारांचे म्होरके आहेत अशी टीका केली. शाह म्हणाले, “भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचं काम हे शरद पवारांनीच केलं आहे.”. याबरोबरच अमित शहा म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यास मराठा समाजाला आरक्षण मिळते आणि शरद पवार यांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर मराठा आरक्षण संपते. (इंडियन एक्सप्रेस)

  • 2/10

    अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर ते करोडोंच्या मालमत्तेचे मालक आहेत. त्यांनी महाराष्ट्रात मोठे साम्राज्य निर्माण केले आहे. तसेच शरद पवार यांनी सर्वाधिक रक्कम शेअर्समध्ये गुंतवली आहे. (इंडियन एक्सप्रेस)

  • 3/10

    २०२० च्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना शरद पवार यांनी शपथपत्रात दिलेल्या तपशिलानुसार, ते सुमारे ३२ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. (इंडियन एक्सप्रेस)

  • 4/10

    २०२० साली त्यांच्याकडे २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची जंगम आणि ७ कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्ता होती. (इंडियन एक्सप्रेस)

  • 5/10

    myneta.info वेबसाइटनुसार, शरद पवार, त्यांची पत्नी आणि मुलांच्या नावावर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ९ कोटींहून अधिक रक्कम जमा आहे. २०२० मध्ये त्यांच्या घरात सुमारे ६० लाख रुपये रोख होते. (इंडियन एक्सप्रेस)

  • 6/10

    शरद पवार यांनी सर्वाधिक पैशांची गुंतवणूक शेअर्स, बाँड्स आणि डिबेंचर्समध्ये केली आहे. त्यांनी एकूण ७,४६,२४,४४९ इतक्या रुपयांची गुंतवणूक केली आहे. (इंडियन एक्सप्रेस)

  • 7/10

    शरद पवार यांच्या घरात ८८ लाखांहून अधिक किमतीचे दागिने आहेत. त्याचवेळी त्यांच्यावर २०२० पर्यंत ७ कोटी रुपयांहून अधिक कर्ज होते. (इंडियन एक्सप्रेस)

  • 8/10

    महाराष्ट्रातील बारामती येथे शरद पवार आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर प्रत्येकी एक कोटी ३० लाख रुपयांची शेतजमीन आहे. बारामतीतच या दोघांच्या नावे प्रत्येकी ९१ लाख रुपयांची बिगरशेती जमीन आहे. (इंडियन एक्सप्रेस)

  • 9/10

    महाराष्ट्रातील पुण्यात शरद पवार यांच्या नावाने तीन कोटी १२ लाख ५० हजार रुपये किमतीची व्यावसायिक इमारतही आहे. (इंडियन एक्सप्रेस)

  • 10/10

    महाराष्ट्रातील मालेगावमध्ये शरद पवार यांच्या पत्नीच्या नावावर एक निवासी घर आहे, ज्याची किंमत सुमारे दोन कोटी १७ लाख रुपये आहे. (इंडियन एक्सप्रेस) हेही वाचा- “महाविकास आघाडी म्हणजे…”, भाजपा प्रदेश अधिवेशनात अमित शाहांची मविआवर खोचक टीका! वाचा …

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsशरद पवारSharad Pawar

Web Title: Sharad pawar s empire is spread in these areas of maharashtra he has invested the biggest amount in shares spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.