-

काल २३ जुलै रोजी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारमण यांनी सादर केला.
-
सीतारमण यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
-
कॅन्सरच्या औषधांपासून ते सोने-चांदीपर्यंत अनेक गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. मात्र अनेक वस्तूंच्या किमती वाढल्याही आहेत
-
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अनेक वस्तूंच्या किमतीमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. परंतु इंधनांच्या दरांमध्ये कोणतेही बदल झाले नाहीत. (Photo: @Indian Express)
-
देशामध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. (Photo: pixabay)
-
यानुसार जर आपण देशातील प्रमुख शहरांतील दरांवर नजर टाकली तर अंदमान निकोबारमधील ‘पोर्ट ब्लेर’ या शहरामध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल मिळत आहे. येथे ८२.४२ रुपये पेट्रोल तर डिझेलचा भाव ७८.०१ रुपये लिटर आहे. (Photo: @financial express)
-
राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव लिटरमागे ९४.७२ रुपये आहे. (Photo: @Financial Express)
-
महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.२१ रुपये तर डिझेल ९२.१५ रुपये इतके आहेत. (Photo: @Indian Express)
PHOTOS : बजेटनंतर आज देशामध्ये पेट्रोल व डिझेलचे दर किती? वाचा माहिती
काल देशाचे बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केले, त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी देशामध्ये इंधनाचे दर कसे आहेत, याबद्दल जाणून घेऊयात.
Web Title: Todays petrol and diesel prices rates of petrol and diesel today in india spl