• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. wayanad landslides caused by heavy rains hit the villages of mundakkai chooralmala attamala and noolpuzha spl

वायनाडमधील भूस्खलनात ४ गावं झाली उद्ध्वस्त; नद्या व चिखलात लोकांचे अवयव सापडले, मन हेलावून टाकतील ही छायाचित्रे

वायनाड भूस्खलन: केरळमधील वायनाडमध्ये ३० जुलै रोजी अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन ४ गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, अनेक बेपत्ता आहेत आणि लष्कर मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे.

August 3, 2024 12:11 IST
Follow Us
  • Wayanad Landslide
    1/8

    केरळमधील वायनाड येथे ३० जुलै रोजी पहाटे भूस्खलन झाले. दुर्घटनेला चार दिवस उलटून गेले असले तरी ढिगाऱ्याखालून मृत आणि जिवंत लोकांना बाहेर काढण्याचे बचाव कार्य सुरु आहे. शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. केंद्र सरकारने राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

  • 2/8

    भारतीय लष्कर वायनाडमध्ये बचाव मोहीम राबवत आहे. मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या भूस्खलनग्रस्त भागातील गावांमध्ये सहा झोनमध्ये बचाव कर्मचाऱ्यांची ४० पथके पीडितांचा शोध घेत आहेत.

  • 3/8

    आतापर्यंत या अपघातातील मृतांचा आकडा ३०० च्या वर पोहोचला आहे. १०० हून अधिक लोक रुग्णालयात आहेत, तर अपघाताला चार दिवस उलटले तरी २०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.

  • 4/8

    लष्कर आता मोबाईलच्या शेवटच्या लोकेशननुसार लोकांना शोधण्याचे काम करत आहे. लष्कर आणि बचाव पथक युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. एका मुसळधार पावसाच्या माऱ्याने आणि सलग ४ भूस्खलनाच्या घटनेमुळे चार गावे उद्ध्वस्त झाली आहेत.

  • 5/8

    पहाटे दोनच्या सुमारास पहिले भूस्खलन झाले, त्यानंतर पहाटे ४.३० वाजता पुढील भूस्खलन झाले. या नैसर्गिक आपत्तीच्या तीव्रतेचा अंदाज यावरून लावता येतो की बचाव कर्मचाऱ्यांना नद्या आणि चिखलात लोकांचे विकृत स्थितीत शरीराचे अवयव सापडत आहेत.

  • 6/8

    सर्वत्र केवळ विध्वंसाची दृश्ये दिसत आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली, जलाशय पाण्याने भरले आणि झाडे उन्मळून पडली. या दुर्घटनेत नेमक्या किती लोकांचा मृत्यू झाला हे सांगणे अद्याप अवघड आहे.

  • 7/8

    अजूनही अनेक लोक बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, हवामान खात्याने वायनाडमध्ये काल म्हणजेच २ ऑगस्ट रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता.

  • 8/8

    पावसाचा अंदाज पाहता त्रिशूर, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि शिक्षण केंद्रांसह सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये काल सुट्टी जाहीर करण्यात आली होती. (पीटीआय फोटो)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Wayanad landslides caused by heavy rains hit the villages of mundakkai chooralmala attamala and noolpuzha spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.