• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. vinesh phogat case harish salve high profile cases including vodafone mahindra and tata spl

Vinesh Phogat आधी हरीश साळवे यांनी अंबानी, महिंद्रा आणि टाटा यांच्यासह ‘या’ हाय प्रोफाइल केसेस लढल्या आहेत, वाचा

Harish Salve’s High-profile Cases: विनेश फोगटच्या आधी, हरीश साळवे यांनी व्होडाफोन टॅक्स केस, सलमान खान हिट-अँड-रन आणि कुलभूषण जाधव प्रकरण यासारख्या अनेक हाय-प्रोफाइल केसेस लढल्या आहेत. त्यांनी रतन टाटा, मुकेश अंबानी आणि केशव महिंद्रा यांच्या केसेसही यशस्वीपणे लढल्या आहेत.

August 12, 2024 16:25 IST
Follow Us
  • Vinesh Phogat
    1/13

    पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कुस्तीच्या अंतिम सामन्यापूर्वीच 50 किलो गटात सहभागी झालेल्या विनेशचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले होते. दरम्यान, विनेशने या निर्णयाविरोधात क्रीडा लवाद न्यायालयात दावा दाखल केला.

  • 2/13

    आता प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी विनेशला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी घेतली आहे. ते विनेश फोगटची केस लढवत असून भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे न्यायालयीन पातळीवर नेतृत्व करत आहेत. दरम्यान, याआधीही हरीश साळवे यांनी अनेक हायप्रोफाईल खटले लढवले आहेत. त्यांनी लढलेल्या मोठ्या खटल्यांबद्दल जाणून घेऊया.

  • 3/13

    दिलीप कुमार
    हरीश साळवे यांनी 1975 मध्ये अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर ठेवण्यात आलेल्या काळ्या पैशाच्या आरोप प्रकरणापासून त्यांच्या करिअरची सुरुवात केली. या प्रकरणात हरीश त्यांच्या वडिलांना मदत करत होते. दिलीप कुमार यांच्यावर काळा पैसा जमवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

  • 4/13

    सलमान खान
    2015 साली हिट अँड रन प्रकरणी सलमान खानला कोर्टाने 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. हरीश साळवे यांनी याप्रकरणी सलमान खानची बाजू मांडली. त्यानंतर हिट-अँड-रन आणि ड्रंक-अँड-ड्राइव्ह प्रकरणात त्याला सर्व आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले.

  • 5/13

    कुलभूषण जाधव
    2017 मध्ये कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत सरकारची बाजू मांडत कुलभूषण जाधव यांची बाजू मांडली होती. या खटल्यासाठी साळवे यांनी केवळ एक रुपया मानधन घेतले होते.

  • 6/13

    व्होडाफोन
    साळवे यांनी व्होडाफोनला 14,200 कोटी रुपयांच्या कथित करचोरीचा खटला जिंकण्यास मदत केली होती. सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आणि म्हटले की, कंपनीने परदेशात केलेल्या व्यवहारांवर कर वसूल करण्याचा अधिकार भारतीय कर प्रशासनाला नाही.

  • 7/13

    मुकेश अंबानी
    प्रसिद्ध कृष्णा गोदावरी बेसिन गॅस प्रकरणी अंबानी बंधूंमध्ये वाद झाला तेव्हा हरीश साळवे यांनी मुकेश अंबानी यांची बाजू घेतली. मुकेश यांनी त्यांचे भाऊ अनिल अंबानी यांच्या रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस लिमिटेडच्या विरोधात या प्रकरणात बाजू लढवली होती.

  • 8/13

    केशव महिंद्रा
    सुप्रीम कोर्टात युनियन कार्बाइड प्रकरणाच्या सुनावणीत हरीश साळवे यांनी केशव महिंद्रा यांची बाजू मांडली होती. न्यायालयाने महिंद्रांसह युनियन कार्बाइडच्या 7 अधिकाऱ्यांवरचे हत्येचे दोषी असलेले आरोप फेटाळून लावले होते. त्याविरोधात सरकारने ‘क्युरेटिव्ह पिटिशन’ दाखल केली होती, ज्यामध्ये महिंद्रा यांचे प्रतिनिधित्व साळवे यांनी केले होते.

  • 9/13

    रतन टाटा
    नीरा राडिया टेप प्रकरणात गोपनीयतेच्या उल्लंघनाचा प्रश्न घेऊन रतन टाटा सर्वोच्च न्यायालयात गेले. तेव्हा त्यांचे वकील साळवेच होते.

  • 10/13

    टाटा सन्स विरुद्ध सायरस मिस्त्री
    टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांच्याविरुद्धच्या कायदेशीर लढाईत हरीश साळवे यांनी टाटा सन्सचे प्रतिनिधित्व केले होते. ज्यानंतर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने मिस्त्री यांची याचिका फेटाळली, त्यांना काढून टाकण्याचे समर्थन केले.

  • 11/13

    बिल्किस बानो
    हरीश साळवे हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या आदेशानुसार 2003 मध्ये गुजरात दंगल पीडित बिल्किस बानोसाठी हजर झाले होते.

  • 12/13

    आरुषी-हेमराज खून प्रकरण
    हरीश साळवे हे आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांडात बचाव पक्षाचे वकील म्हणून हजर झाले होते.

  • 13/13

    राम मंदिराचा वाद
    रामजन्मभूमी वादात हिंदूंची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या यादीत हरीश साळवे यांचेही नाव आहे. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचे आदेश दिले होते.

TOPICS
ऑलिम्पिक २०२४ (Olympic 2024)Olympic 2024मराठी बातम्याMarathi Newsविनेश फोगटVinesh Phogatहरिश साळवेHarish Salve

Web Title: Vinesh phogat case harish salve high profile cases including vodafone mahindra and tata spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.