• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. nabanna protest mamata govt deploy 6000 policeman what is nabanna know here spl

Nabanna Protest : कोलकात्यामध्ये ‘नबन्ना’ आंदोलन; विद्यार्थी व पोलिसांमध्ये बाचाबाची, नबन्नाचा अर्थ काय होतो?

What is Nabanna Protest? कोलकाता बलात्कार प्रकरणावरून पश्चिम बंगालमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. कोलकात्याच्या रस्त्यावर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नबान्ना अभियान म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊ.

August 28, 2024 11:34 IST
Follow Us
  • Nabanna Protest in Kolkata
    1/11

    कोलकाता बलात्कार प्रकरणावरून पश्चिम बंगालमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. परिस्थिती अशी आहे की, विद्यार्थी नबन्ना मोर्चा काढून राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. (Photo: Indian Express By Partha)

  • 2/11

    दरम्यान, काल या मोर्चामध्ये विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. (Express Photo by Partha Paul)

  • 3/11

    यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या. पण ‘नबन्ना’ म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का? याआधीही नबन्ना मोहिमेअंतर्गत झालेल्या मोर्चांमध्ये बराच गदारोळ झाला आहे. याबद्दल जाणून घेऊ. (Photo: Indian Express By Partha)

  • 4/11

    आंदोलक विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी हावडा येथील संत्रागाछी येथे बॅरिकेड्स लावले होते, जे विद्यार्थ्यांनी तोडले. संत्रागाछीमध्ये सध्या प्रचंड गोंधळ सुरू आहे. (Photo: Indian Express By Partha)

  • 5/11

    नबन्ना मोहिमेच्या घोषणेनंतर पश्चिम बंगालमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आणि निदर्शन रोखण्यासाठी तब्बल ६०,००० पोलिस तैनात करण्यात आले. (Express Photo by Partha Paul)

  • 6/11

    काही काळासाठी हावडा ब्रिजही सील करण्यात आला. तसेच कोलकात्यात अनेक स्तरांवर सुरक्षा वाढवण्यात आली. (Express Photo by Partha Paul)

  • 7/11

    नबन्ना म्हणजे काय?
    दरम्यान, हावडा येथे नबन्ना नावाची एक इमारत आहे. ही इमारत म्हणजे सरकारचे राज्य सचिवालय आहे. यास ‘नबन्ना भवन’ म्हणतात. या १४ मजली इमारतीत पश्चिम बंगाल सरकारची कार्यालये आहेत. (Photo: Indian Express By Partha)

  • 8/11

    मुख्यमंत्र्यांचे कार्यालयही येथे आहे
    या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आहे. गृह सचिवांचे कार्यालय १३ व्या मजल्यावर आहे तर गृहखात्याचे कार्यालय पाचव्या मजल्यावर आहे. २०१३ मध्ये ममता बॅनर्जी यांनी त्यांचे कार्यालय याठिकाणी स्थलांतरित केले. पूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे कार्यालय रायटर्स या बिल्डिंगमध्ये असायचे. (Photo: Indian Express By Partha)

  • 9/11

    नबान्नाचा अर्थ काय?
    नबन्ना म्हणजे सुगीचा सण जो शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तांदळाचे नवीन पीक तयार झाल्यावर हा सण पश्चिम बंगालपासून बांगलादेशपर्यंत साजरा केला जातो. याला नोबो-ऑन्नो म्हणतात म्हणजे नवीन तांदूळ. (Photo: Indian Express By Partha)

  • 10/11

    याआधीही नबान्नाचे आंदोलन झाले होते
    २०२१ मध्ये नबन्ना आंदोलन झाले करण्यात आले होते आणि तेव्हाही बराच गदारोळ झाला होता. या संघटनेचे नेतृत्व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, लेफ्ट फ्रंट आणि इतर डावे पक्ष आणि विद्यार्थी संघटनांनी केले होते. (Photo: Indian Express By Partha)

  • 11/11

    हेही वाचा: जगातील 10 वेगवान ट्रेन्स कोणत्या?; भारतीय रेल्वे या यादीत आहे की नाही?, वाचा

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Nabanna protest mamata govt deploy 6000 policeman what is nabanna know here spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.