-
छत्रपती शिवरायांचा पुतळा राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आला होता जो आठ महिन्यांत कोसळला. त्याचा निषेध नोंदवत आज महाविकास आघाडीने मुंबईत आंदोलन केलं.
-
या आंदोलनात शरद पवार, उद्धव ठाकरे, शाहू महाराज, नाना पटोले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (सर्व फोटो-संकल्पदीप बॅनर्जी, इंडियन एक्सप्रेस)
-
वर्षा गायकवाड आणि त्यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घेऊन आंदोलनात उतरल्या होत्या.
-
उद्धव ठाकरे हे भगवा झेंडा हाती घेऊन अनिल देशमुख आणि नाना पटोले यांच्याबरोबर आंदोलनात सहभागी झाले.
-
मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया या भागात आज हे आंदोलन पार पडलं.
-
महाविकास आघाडीने या आंदोलनाला जोडे मारो आंदोलन असं नाव दिलं होतं. यावेळी सरकारच्या फोटोंना जोडे मारण्यात आले.
-
या आंदोलनात सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच लक्षवेधी ठरला हा फोटो. कारण उद्धव ठाकरेंनी या फोटोत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारले. अजित पवार हे त्यांचे महाविकास आघाडीतले सहकारी. तर देवेंद्र फडणवीस युतीतले सहकारी. एकनाथ शिंदे तर त्यांचेच विश्वासू पण आता ते सगळं सोडून उद्धव ठाकरे पुढे आले आहेत हे दाखवणाराच हा फोटो ठरला. (फोटो सौजन्य-उद्धव ठाकरे, शिवसेना, एक्स पेज)
-
या जोडे मारो आंदोलनात जेव्हा महाविकास आघाडीतले तीन पक्षांचे कार्यकर्ते जमले तेव्हा त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
-
विविध प्रकारचे फलक आणि झेंडे हाती घेऊन शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
-
या आंदोलनाच्या वेळी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादनही केलं.
उद्धव ठाकरेंनी शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या फोटोला मारले जोडे, महाराष्ट्र हे चित्र कधीच विसरणार नाही!
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात संतपाची लाट उसळली. महाविकास आघाडीने मुंबईत जोडे मारो आंदोलन केलं.
Web Title: Uddhav thackeray beat with shoes to eknath shinde devendra fadnavis and ajit pawar photos scj