• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. this dream of sitaram yechury remained unfulfilled he studied from this top college of delhi who is in his family spl

Sitaram Yechury : सीताराम येचुरींचे ‘हे’ स्वप्न अधुरेच राहिले, त्यांची पत्नी व मुलगी काय करतात? जाणून घ्या

Sitaram Yechury Family and Education: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.

September 12, 2024 19:15 IST
Follow Us
  • Who is in Sitaram Yechury's family
    1/9

    मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी आता राहिले नाहीत. जगातील दिग्गज नेत्यांपैकी एक असलेले सीताराम येचुरी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. त्यांना ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते आणि त्यांना बराच वेळ ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. सीताराम येचुरी हे अतिशय शिक्षित नेते होते. फार कमी लोकांना माहित असेल की त्यांचे एक स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात. (इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    आई होती सरकारी अधिकारी
    सीताराम येचुरी यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ रोजी मद्रास येथे झाला. त्यांची आई सरकारी अधिकारी होती आणि वडील आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळात अभियंता होते. (इंडियन एक्सप्रेस)

  • 3/9

    सीताराम येचुरी हे अतिशय हुशार विद्यार्थी होते
    सीताराम चेयुरी यांचे बालपण हैदराबादमध्ये गेले जेथे त्यांनी ऑल सेंट्स हायस्कूलमधून दहावीपर्यंत शिक्षण घेतले. यानंतर १९६९ मध्ये ते दिल्लीला आले आणि त्यांनी प्रेसिडेंट इस्टेट स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि १२ वीपर्यंत शिक्षण घेतले. येचुरी हे खूप हुशार विद्यार्थी होते आणि त्यांनी सीबीएसई बोर्डात १२वी मध्ये संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावले होते. (इंडियन एक्सप्रेस)

  • 4/9

    दिल्लीच्या या टॉप कॉलेजमधून शिक्षण घेतले
    पुढील अभ्यासासाठी, त्यांनी सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात बीए ऑनर्ससह पदवी प्राप्त केली, जे दिल्ली विद्यापीठाच्या सर्वोच्च महाविद्यालयांपैकी एक आहे. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) अर्थशास्त्रात M.A. केले. दोन्ही ठिकाणी ते अव्वल राहिले होते. (इंडियन एक्सप्रेस)

  • 5/9

    अधुरे स्वप्न
    पोस्ट ग्रॅज्युएशननंतर सीताराम येचुरी यांना जेएनयूमधूनच अर्थशास्त्रात पीएचडीसाठी प्रवेश मिळाला. पण १७७५ मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांना अटक झाली, त्यानंतर त्यांची पीएचडी अर्धवट राहिली आणि त्यांच्या नावावर डॉक्टर ही पदवी जोडली जाऊ शकली नाही. त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले. (इंडियन एक्सप्रेस)

  • 6/9

    सीताराम येचुरी यांच्या पत्नी कोण आहेत?
    सीताराम येचुरी यांचा विवाह सुप्रसिद्ध पत्रकार सीमा चिश्ती यांच्याशी झाला आहे, त्या द वायरच्या संपादक आहेत. याशिवाय सीमा यांनी अनेक मोठ्या मीडिया संस्थांमध्ये काम केले आहे. ScoopWhoop ला दिलेल्या त्यांच्या एका मुलाखतीत सीताराम येचुरी यांनी सांगितले होते की त्यांची पत्नी त्यांना आर्थिक मदत करते. (इंडियन एक्सप्रेस)

  • 7/9

    काय करते मुलगी?
    सीमा चिश्ती यांच्या आधी सीताराम येचुरी यांनी वीणा मजुमदार यांची मुलगी इंद्राणी मजुमदार यांच्याशी लग्न केले होते आणि या लग्नापासून त्यांना एक मुलगी देखील आहे. त्यांची मुलगी अखिला येचुरी एडिनबर्ग विद्यापीठ आणि सेंट अँड्र्यूज विद्यापीठात शिकवते. (इंडियन एक्सप्रेस)

  • 8/9

    मुलाचे निधन कसे झाले?
    सीताराम येचुरी यांना आशिष येचुरी नावाचा मुलगाही होता. पण २२ एप्रिल २०२१ रोजी वयाच्या ३४ व्या वर्षी कोरोनामुळे त्यांचे निधन झाले. (इंडियन एक्सप्रेस)

  • 9/9

    हेही वाचा- विनेश फोगटआधी ‘या’ १० बड्या खेळाडूंनी राजकारणात आजमावले नशीब, काहींचा पराभव झाला तर काहींना मिळाले यश

TOPICS
मराठी बातम्याMarathi NewsराजकारणPolitics

Web Title: This dream of sitaram yechury remained unfulfilled he studied from this top college of delhi who is in his family spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.