• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. son is three times richer than tamil nadu chief minister mk stalin know net worth of deputy cm udhayanidhi stalin spl

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यापेक्षा तिप्पट श्रीमंत आहेत उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन, वाचा संपत्तीची माहिती

M.K. Stalin son Udhayanidhi Stalin: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अलीकडेच त्यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. बाप मुख्यमंत्रिपदावर तर मुलगा उपमुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेत असणे तामिळनाडूत हे दुसऱ्यांदा घडत आहे.

Updated: September 30, 2024 19:01 IST
Follow Us
  • net worth of udaynidhi stalin
    1/9

    उदयनिधी स्टॅलिन हे तामिळनाडूच्या राजकारणात एक प्रमुख चेहरा म्हणून उदयास आले आहेत. अलीकडेच त्यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली असून, ते तामिळनाडूचे सर्वात तरुण उपमुख्यमंत्री बनले आहेत. (Photo Source: Udhayanidhi Stalin/Facebook)

  • 2/9

    तामिळनाडूमध्ये वडील मुख्यमंत्रीपद तर पुत्र उपमुख्यमंत्रीपद भूषविण्याची ही दुसरी वेळ आहे. (Photo Source: Udhayanidhi Stalin/Facebook)

  • 3/9

    यापूर्वी २००९-२०११ दरम्यान एम.के. स्टॅलिन हे स्वतः त्यांचे वडील एम. करुणानिधी यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री होते. राज्य सरकारमध्ये अशी महत्त्वाची भूमिका बजावणारे उदयनिधी हे त्यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील नेते आहेत. (Photo Source: Udhayanidhi Stalin/Facebook)

  • 4/9

    उदयनिधी स्टॅलिन यांची राजकीय कारकीर्द २०२१ मध्ये सुरू झाली, जेव्हा ते पहिल्यांदा आमदार झाले. चार वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांनी आमदार ते उपमुख्यमंत्री असा प्रवास केला आहे. (Photo Source: Udhayanidhi Stalin/Facebook)

  • 5/9

    एमके स्टॅलिनबद्दल सांगायचे तर, त्यांची राजकीय कारकीर्द त्यांच्या किशोरावस्थेत सुरू झाली. त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी १९६७ च्या निवडणुकीत त्यांचे काका मुरासोली मारन यांच्यासाठी प्रचार केला. १८९६ मध्ये ते चेन्नईचे महापौर बनले आणि २००९ ते २०११ पर्यंत तामिळनाडूचे पहिले उपमुख्यमंत्री होते. (Photo Source: Udhayanidhi Stalin/Facebook)

  • 6/9

    २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ‘सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स’ अंतर्गत निवडणूक लढवली आणि २३४ पैकी १५९ जागा जिंकल्या. (Photo Source: Udhayanidhi Stalin/Facebook)

  • 7/9

    तर, उदयनिधी स्टॅलिन यांनी केवळ आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवला नाही तर चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवला आहे. (Photo Source: Udhayanidhi Stalin/Facebook)

  • 8/9

    उदयनिधी स्टॅलिन यांनी राजकारणात येण्यापूर्वी तमिळ चित्रपट उद्योगात यशस्वी कारकीर्द केली होती. साऊथ सुपरस्टार कमल हासन आणि विजय यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. याशिवाय ‘ओरू कल ओरू कन्नडी’सह अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. (Photo Source: Udhayanidhi Stalin/Facebook)

  • 9/9

    निव्वळ संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, २०२१ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार उदयनिधी स्टॅलिन यांची मालमत्ता २९ कोटी रुपये आहे, जी त्यांचे वडील एमके स्टॅलिन यांच्या ८.८९ कोटी रुपयांच्या संपत्तीच्या तिप्पट आहे. (Photo Source: Udhayanidhi Stalin/Facebook)
    हेही वाचा- Manvat Murders पासून CTRL पर्यंत, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात OTT वर होणार मनोरंजनाच…

TOPICS
एम. के. स्टॅलिनMK StalinतमिळनाडूTamil Naduमराठी बातम्याMarathi News

Web Title: Son is three times richer than tamil nadu chief minister mk stalin know net worth of deputy cm udhayanidhi stalin spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.