• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. apart from vinesh phogat which other players contested the haryana assembly election 2024 see who won and who lost spl

विनेश फोगट झाली आमदार; ‘हे’ खेळाडूही होते निवडणूक मैदानात, कोणाचा निकाल काय आला?

Indian players in Haryana assembly Election 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी किती खेळाडू मैदानात होते? विनेश फोगट व्यतिरिक्त इतर कोणते खेळाडू निवडणूक लढले?

October 9, 2024 13:29 IST
Follow Us
  • players in Haryana assembly Election 2024
    1/9

    हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आले असून भाजपाने हॅट्ट्रिक साधली आहे. (Photo- Vinesh Phogat/ Instagram)

  • 2/9

    राज्यात भाजपा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. हरियाणात भाजपने ४८ जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेसचे संख्याबळ ३७ जागांवर घसरले.

  • 3/9

    हरियाणात निवडणूक लढवणारे खेळाडू
    जुलाना ही जागा हरियाणातील प्रमुख विधानसभा मतदारसंघांपैकी एक होती जिथून माजी कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या विनेश फोगट विजयी झाल्या. अशा परिस्थितीत, हरियाणामध्ये यावेळी किती खेळाडूंनी निवडणूक लढवली आणि कोण जिंकले आणि कोण हरले?, हे जाणून घेऊया. (Photo- Vinesh Phogat/ Instagram)

  • 4/9

    विनेशची स्पर्धा कोणाशी होती?
    सर्वप्रथम विनेश फोगटबद्दल बोलूया. विनेश यांना काँग्रेसने हरियाणाच्या जुलाना मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उतरवले होते. विनेश फोगट यांना एकूण ६५,०८० मते मिळाली आहेत. त्यांनी ६,०१५ मतांनी हा विजय संपादन केला. त्यांचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे योगेश कुमार होते, त्यांना ५९,०६५ मते मिळाली. या जागेवरून आणखी एका स्टार रेसलरने विनेश फोगटला आव्हान दिले होते. (Photo- Vinesh Phogat/ Instagram)

  • 5/9

    इतकीच मते मिळाली
    WWE कुस्तीपटू कविता देवी जुलाना सीटवरून विनेश फोगटसमोर होती. मात्र कविता देवी यांना प्रचंड मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या जागेवरून आम आदमी पक्षाने कविता यांना तिकीट दिले होते. त्यांना केवळ १२८० मते मिळाली. अशा परिस्थितीत कविता देवी यांचा विनेश फोगट यांच्याकडून ६३,८०० मतांनी पराभव झाला आहे. (Photo- Kavita devi/Instagram)

  • 6/9

    या खेळाडूही होता मैदानात
    हरियाणातील निवडणुकीच्या मैदानात नशीब आजमावण्यासाठी एकूण तीन खेळाडू मैदानात होते. विनेश आणि कविता यांच्याशिवाय कबड्डीचा स्टार खेळाडू दीपक हुड्डा यांनीही राजकारणात नशीब आजमावले पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. (Photo- Deepak Nivas Hudda/ Instagram)

  • 7/9

    कोण आहेत दीपक हुडा?
    दीपक हुडा हे भारतीय कबड्डी संघाचे कर्णधारही राहिले आहेत. २०१६ मध्ये भारतीय कबड्डी संघाचा विश्वचषक जिंकण्यात दीपक हुड्डा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यासह, २०१६ आणि २०१९ मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ते भाग होते. (Photo- Deepak Nivas Hudda/ Instagram)

  • 8/9

    दीपक हुडा किती मतांनी पराभूत झाले?
    भाजपने मेहम मतदारसंघातून दीपक हुडा यांना तिकीट दिले होते. या जागेवरून काँग्रेसने बलराम डांगी यांना उमेदवारी दिली होती, ते विजयी झाले. बलराम डांगी यांना एकूण ५६,८६५ मते मिळाली आणि ते १८,०६० मतांच्या फरकाने विजयी झाले. या जागेवरून दीपक हुडा यांना केवळ ८,२२९ मते मिळाली. त्यांनी ही निवडणूक ४७,९३६ मतांच्या फरकाने गमावली आहे. (Photo- Deepak Nivas Hudda/ Instagram)

  • 9/9

    हेही वाचा- Vinesh Phogat : जुलान्यातील विजयानंतर कुस्तीपटू विनेश फोगट झाली आमदार, मिळणार ‘इतका’ पगार!

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsविनेश फोगटVinesh PhogatहरियाणाHaryanaहरियाणा विधानसभा निवडणूक २०२४Haryana Assembly Election 2024

Web Title: Apart from vinesh phogat which other players contested the haryana assembly election 2024 see who won and who lost spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.