-
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशचे अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर भारतासोबतचे संबंध बिघडत आहेत. मोहम्मद युनूस सरकारच्या अनेक निर्णयांमुळे दोन्ही देशांमध्ये ही दुरवस्था निर्माण झाली आहे. बांगलादेश इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्ण दास प्रभू यांच्या अटकेवरून सध्या बांगलादेश सरकारवर जोरदार टीका होत आहे. (फोटो: रॉयटर्स)
-
एका निवेदनात इस्कॉनने बांगलादेश सरकारच्या या पावलाचा निषेध केला असून सर्व धर्माचे लोक एकत्र राहतील असे वातावरण त्यांनी निर्माण करावे, असे आवाहन केले आहे. यासोबतच बांगलादेशातील विविध भागात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. (फोटो: रॉयटर्स)
-
बांगलादेश आज हिंदूंच्या विरोधात अशी पावले उचलत असला तरी भारत आपल्या शेजारी देशाच्या पाठीशी नेहमी उभा राहिला आहे. आजही बांगलादेशातील लोक अनेक गोष्टींसाठी भारतावर अवलंबून आहेत. (फोटो: एपी)
-
बांगलादेश वीज आणि इतर अनेक आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या आणि भांडवल-केंद्रित प्रकल्पांसाठी भारतावर अवलंबून आहे. गेल्या दशकात भारताने ढाक्याच्या विकासात खूप मदत केली आहे. (फोटो: एपी)
-
इस्लामिक कट्टरतावाद्यांमुळे आज बांगलादेश असे निर्णय घेत असला तरी भारताने त्यांच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या काही वर्षांत, भारताने बांगलादेशला ८ बिलियन डॉलर्स एवढ्या किमतीचे अनेक क्रेडिट लाइन (LOC) आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी अतिरिक्त अनुदान सहाय्य दिले आहे यावरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
या क्षेत्रांमध्ये रेल्वे, शिपिंग, बंदरे, सिंचन आणि रस्ते यांचा समावेश होतो. बांगलादेशातील फूड बास्केट आणि फार्मास्युटिकल उद्योगही पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील एकूण व्यापार १५.९३ बिलियन डॉलरचा राहिला आहे.
-
बांगलादेशला सध्या नैसर्गिक आपत्ती, अन्न आणि ऊर्जा सुरक्षेचा धोका आहे. यासह, नवी दिल्लीस्थित थिंक टँक IIS चे प्रोफेसर प्रबीर डे यांच्या म्हणण्यानुसार, बांगलादेशच्या आर्थिक आव्हानांमध्ये कर्ज चुकवणे, खराब कॉर्पोरेट प्रशासन आणि इंधन आणि विजेच्या वाढत्या किमती यांचा समावेश आहे.
-
या वर्षी जूनपर्यंत बांगलादेशचे बाह्य कर्ज १०३.८ बिलियन डॉलर होते. त्यामुळे देशावर मोठे संकट उभे ठाकले आहे. बांगलादेशात आर्थिक भूकंप झाला तर त्याचा परिणाम भारतावरच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियावर होईल. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
अशा परिस्थितीत बांगलादेशला आपल्या अर्थव्यवस्थेवरील संकटावर मात करण्यासाठी कोणत्याही किंमतीत भारताची मदत घ्यावी लागणार आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद युनूस सरकारने दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी काम करायला हवे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
भारताशिवाय अपूर्ण आहे बांगलादेश, ‘या’ गोष्टींवर आहे अवलंबून
Why is Bangladesh incomplete without India: सध्या बांगलादेश आणि भारताचे संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या निर्णयांमुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडत चालले आहेत.
Web Title: Why is bangladesh incomplete without india bangladeshis are dependent on these indian things spl