-
दक्षिण ब्राझीलमधील लोकप्रिय पर्यटन शहर ग्रामाडोच्या मध्यभागी १० जणांना घेऊन जाणारे छोटे विमान काल (२२ डिसेंबर) दुकानांवर कोसळले. (फोटो: रॉयटर्स)
-
तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की विमान पहिल्यांदा शहरातील इमारतीला धडकले नंतर त्याचा तोल सुटला आणि लोकांच्या घरांना धडकत शेवटी एका फर्निचरच्या दुकानावर कोसळले. (फोटो: रॉयटर्स)
-
प्राथमिक तपासातून अशी माहिती समोर आली आहे की या भीषण अपघातात प्रवाशांपैकी कोणीही बचावले नाही. त्यामुळे देशात सध्या सर्वत्र दुःखाचं वातावरण आहे. (फोटो: एपी)
-
दरम्यान, या विमान अपघातामुळे आग लागली होती त्यामुळे धुराचे लोण हवेत पसरले गेले, त्याचा परिणाम स्थानिक नागरिकांवर झाला. श्वासोच्छवासाच्या समस्या आणि जखमी झालेल्या किमान १५ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. (फोटो: रॉयटर्स)
-
डोंगराळ प्रदेशात वसलेले ग्रामाडो हे ब्राझीलचे रिओ ग्रांडे डो सुल मधील मोठे पर्यटन स्थळ आहे, हे स्थळ सणासुदीच्या काळात अधिक व्यस्त असते. (फोटो: रॉयटर्स)
-
काहीच दिवसांआधी या प्रदेशात भीषण पूरही आला होता, त्यानंतर काही महिन्यांनी ही दूर्देवी घटना घडली. (फोटो: एपी)
-
स्थानिक अधिकारी अपघाताच्या कारणांचा शोध घेण्याचे काम करत आहेत, रहिवासी आणि पर्यटक या दुर्घटनेबद्दल शोक करत आहेत. (फोटो: एपी)
-
आज सकाळी विमान अपघाताची ही दृश्ये ड्रोनने टिपली आहेत. (फोटो: रॉयटर्स)
Photos : ब्राझीलमध्ये भीषण विमान अपघात; १० प्रवाशांचा मृत्यू, अख्खं विमान जळून खाक, पाहा फोटो
Brazil Plane Crash : श्वासोच्छवासाच्या समस्या आणि जखमी झालेल्या किमान १५ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Title: Tragic plane crash in brazil claims 10 lives at least 15 people were hospitalized for injuries see photos spl