• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. tahawwur hussain rana the doctor who became a terrorist know his educational qualification spl

दहशतवादी होण्यापूर्वी तहव्वूर राणा काय करायचा? त्याचं शिक्षण किती आहे?

Tahawwur Rana Educational Qualification: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चिकावतनी शहरात जन्मलेला तहव्वुर राणा हा एका मुस्लिम राजपूत कुटुंबातील आहे. त्याने पाकिस्तान आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये डॉक्टर म्हणून काम केले.

April 12, 2025 16:17 IST
Follow Us
  • Tahawwur Rana extradition to India
    1/9

    २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर तहव्वुर हुसेन राणाचे नाव जगभरात चर्चेत आले. पण तुम्हाला माहिती आहे का की ही तीच व्यक्ती आहे जी एकेकाळी पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर होती आणि नंतर कॅनडामध्ये व्यापारी म्हणून राहिली. तहव्वुर राणाची कहाणी एका अशा माणसाची आहे ज्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि सैन्यात सेवा केल्यानंतर दहशतवादाचा मार्ग निवडला. (ANI Photo)

  • 2/9

    तहव्वुर राणा कोण आहे?
    तहव्वुर हुसेन राणा हा पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिक आहे ज्याला दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. त्याचे नाव लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांशी जोडले गेले आहे आणि तो २००८ च्या मुंबई हल्ल्याच्या कटात आणि २००९ मध्ये डॅनिश वृत्तपत्र जिलँड्स-पोस्टेन ९Jyllands-Posten) वरील हल्ल्यातही सहभागी होता. (ANI Photo)

  • 3/9

    शिक्षण आणि लष्करी कारकीर्द
    राणाचा जन्म १२ जानेवारी १९६१ रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चिचावतनी शहरात झाला. तो एका मुस्लिम राजपूत कुटुंबातील आहे. त्याने पाकिस्तानच्या प्रतिष्ठित कॅडेट कॉलेज, हसन अब्दाल येथे शिक्षण घेतले, जिथे त्याची भेट अमेरिकन नागरिक आणि नंतरचा त्याचा सह-षड्यंत्रकार डेव्हिड हेडलीशी झाली. (PTI Photo)

  • 4/9

    तहव्वुरने नंतर मेडिकलचा अभ्यास केला आणि पाकिस्तान आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये कॅप्टन पदावर जनरल ड्युटी प्रॅक्टिशनर म्हणून काम केले. येथून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. (PTI Photo)

  • 5/9

    कुटुंब
    राणाचे वडील शाळेचे मुख्याध्यापक होते आणि त्याच्या कुटुंबाची शैक्षणिक आणि व्यावसायिक स्थिती चांगली राहिलेली आहे. त्याचा एक भाऊ पाकिस्तानी सैन्यात मानसोपचारतज्ज्ञ आणि लेखक आहे, तर दुसरा कॅनेडियन राजकीय वृत्तपत्र द हिल टाईम्सचा (The Hill Times) पत्रकार आहे. राणा शिकागोमध्ये एक अनामिक जीवन जगत होता आणि त्याच्या मुलांशी आणि शेजाऱ्यांशी तो फार कमी संवाद करत होता. (PTI Photo)

  • 6/9

    कॅनडामध्ये नवीन जीवन आणि व्यवसाय
    १९९७ मध्ये, राणा त्याच्या पत्नीसह कॅनडाला गेला. दोघांनीही २००१ मध्ये कॅनडाचे नागरिकत्व मिळवले आणि नंतर ते शिकागो (अमेरिका) येथे स्थायिक झाले. तिथे, तहव्वुरने फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस नावाची एक इमिग्रेशन कन्सल्टन्सी उघडली, जीच्या न्यू यॉर्क आणि टोरंटोमध्येही शाखा होत्या. याशिवाय, त्याने हलील कत्तलखाना देखील उघडला, जिथे इस्लामिक नियमांनुसार प्राण्यांची कुर्बानी दिली जात असे. (PTI Photo)

  • 7/9

    दहशतवादात सहभाग
    २००९ मध्ये, अमेरिकन अधिकाऱ्यांनी डेव्हिड हेडलीसह दहशतवादी कारवायांचे नियोजन केल्याबद्दल तहव्वुर राणाला अटक केली. मुंबई हल्ल्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला होता आणि डेन्मार्कवर हल्ला करण्याचा कटही अयशस्वी झाला. (PTI Photo)

  • 8/9

    अमेरिकेच्या एका न्यायालयाने राणाला मुंबई हल्ल्यातील थेट सहभागातून मुक्त केले असले तरी, दहशतवादाला पाठिंबा देणे, दहशतवादी योजनांमध्ये भाग घेणे आणि डेव्हिड हेडलीला मदत करणे या आरोपाखाली त्याला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. (PTI Photo)

  • 9/9

    तहव्वुर राणाला भारताच्या स्वाधीन करण्यात आले.
    भारतीय एजन्सी बऱ्याच काळापासून राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी करत होत्या. अखेर, २०२३ मध्ये, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाच्या भारताकडे प्रत्यार्पणाला मान्यता दिली, फेब्रुवारी २०२५ मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्याला अधिकृतपणे मान्यता दिली. ९ एप्रिल २०२५ रोजी, राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले, जिथे त्याला मुंबई हल्ल्यातील भूमिकेसाठी एनआयएच्या ताब्यात घेण्यात आले. (PTI Photo) हेही पाहा- Photos : १७ वर्षांनी २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा एनआयएच्या ताब्यात, पाहा फोटो

TOPICS
आंतरराष्ट्रीय बातम्याInternational Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Tahawwur hussain rana the doctor who became a terrorist know his educational qualification spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.