Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pahalgam terror attack rekindles fear a look back at indias deadliest terror incidents since the 1990 era pyd

पहलगाम हल्ला, दहशतवाद्यांचा धसका : १९९० पासून आजपर्यंत झालेले भारतावरील काळीज हलावणारे हल्ले पुन्हा डोळ्यांसमोर

Pehalgam Attack Alike Historical Attacks: पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्याने जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दशकांत घडलेल्या अनेक अमानुष हत्याकांडांची आठवण होते.

Updated: April 23, 2025 13:21 IST
Follow Us
  • Pahalgam Terror Attack Rekindles Fear, A Look Back at India's Deadliest Terror Incidents Since the 1990 era
    1/15

    दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगामजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • 2/15

    या गंभीर हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये याआधी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची दृश्ये डोळ्यासमोर उभी राहतात.

  • 3/15

    १. २२ मार्च १९९७ – संग्रामपुरा हत्याकांड
    १९९७ मध्ये बडगाम जिल्ह्यातील संग्रामपुरा गावात दहशतवाद्यांनी आठ निष्पाप नागरिकांना गोळ्या घालून ठार मारले होते.

  • 4/15

    २. २६ जानेवारी १९९८ – वांधामा हत्याकांड
    १९९८ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या रात्री श्रीनगरच्या वांधमा गावात २३ काश्मिरी पंडित निशाण्यावर होते. या हल्ल्याने देशभरात खळबळ उडाली.
    (फोटो सौजन्य : काश्मीर लाइफ )

  • 5/15

    ३. १७ एप्रिल १९९८ – प्रणकोट-डक्कीकोट हत्याकांड
    १९९८ मध्ये उधमपूर (आता रियासी जिल्हा) येथील दोन गावांमध्ये महिला आणि मुलांसह २९ हिंदूंची हत्या करण्यात आली. काहींचे शिरच्छेदही करण्यात आले.

  • 6/15

    ४. १९ जून १९९८ – चापनारी हत्याकांड
    १९९८ मध्ये दोडा जिल्ह्यातील चापनारी गावात लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी २६ हिंदूंची हत्या केली होती. (फोटो सौजन्य : जनसत्ता)

  • 7/15

    ५. २० मार्च २००० – छत्तीसिंगपोरा घटना
    २००० मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भारत भेटीच्या एक दिवस आधी, अनंतनागच्या छत्तीसिंगपुरा गावात ३५ शिखांची हत्या करण्यात आली होती.

  • 8/15

    ६. १-२ ऑगस्ट २००० – अमरनाथ यात्रेवर हल्ला
    २००० मध्ये अनंतनाग आणि दोडा जिल्ह्यातील पाच ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्ये ३२ अमरनाथ यात्रेकरू आणि कामगारांसह १०५ लोक मारले गेले.

  • 9/15

    ७. ९ फेब्रुवारी २००१ – कोट चारवाल हत्याकांड
    २००१ मध्ये राजौरी जिल्ह्यातील चालवालकोट गावात दहशतवाद्यांनी १५ बकरवाल (भटक्या समुदायाच्या) लोकांना ठार मारले होते.

  • 10/15

    ८. १४ मे २००२ – कालुचक हल्ला
    २००२ मध्ये पाकिस्तानातील तीन दहशतवाद्यांनी जम्मू-पठाणकोट महामार्गावर एका बसमध्ये सात प्रवाशांची हत्या केली आणि नंतर कालुचक लष्करी तळावर हल्ला केला, ज्यामध्ये १० मुले आणि पाच सैनिकांसह २३ लोक ठार झाले. (फोटो सौजन्य : द इकॉनॉमिस्ट)

  • 11/15

    ९. ३० जुलै आणि ६ ऑगस्ट २००२ – नुनवान अमरनाथ कॅम्पवर हल्ला.
    २००२ मध्येच लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी पहलगाममधील नुनवान बेस कॅम्पवर दोनदा हल्ला केला, ज्यामध्ये एकूण ११ भाविक ठार झाले आणि ३० जण जखमी झाले.

  • 12/15

    १०. २३ मार्च २००३ – नदी मार्ग हत्याकांड
    २००३ मध्ये पुलवामा जिल्ह्यातील नदी मार्ग गावात दहशतवाद्यांनी २४ काश्मिरी पंडितांची हत्या केली होती.

  • 13/15

    ११. १० जुलै २०१७ – अमरनाथ यात्रेवर हल्ला
    श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला झाला ज्यामध्ये आठ भाविकांचा मृत्यू झाला. हा हल्ला २०१७ मध्ये झाला होता.

  • 14/15

    १२. १ जानेवारी २०२३ – डांगरी हत्याकांड
    २०२३ मध्ये राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावात दोन दहशतवाद्यांनी गोळीबार आणि आयईडी स्फोटात दोन अल्पवयीन मुलांसह सात हिंदू नागरिकांना ठार मारले. (फोटो सौजन्य : द निऊ इंडियन एक्सप्रेस )

  • 15/15

    १३. ९ जून २०२४ – रियासी बस हल्ला
    गेल्या वर्षी शिवखोरीहून कटरा येथे परतणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात नऊ भाविकांचा मृत्यू झाला आणि ४२ जण जखमी झाले.(फोटो सौजन्य : द इकॉनॉमिस्ट )

( Photo Credits : Pinterest)

TOPICS
आंतरराष्ट्रीय संबंध (International Relation)जम्मू आणि काश्मीरJammu And Kashmirदहशतवादी हल्लाTerror Attackमराठी बातम्याMarathi News

Web Title: Pahalgam terror attack rekindles fear a look back at indias deadliest terror incidents since the 1990 era pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.