-
दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या पॅलेस्टिनमध्ये मानवतावादी मदत येत असताना युद्धग्रस्त गाझामधील संयुक्त राष्ट्रांच्या गोदामात “भुकेल्या लोकांच्या जमावाने” तोडफोड केली. (Source: Reuters Photo)
-
जागतिक अन्न कार्यक्रमाने (WFP) म्हटले आहे की, गाझा येथील मध्यवर्ती गोदामात घुसखोरी झाल्यानंतर दोन लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. (Source: Reuters Photo)
-
“लोकांना उपाशी राहू देणार नाही”, याची खात्री देण्यासाठी अन्न मदत तात्काळ वाढवण्याचे आवाहन WFP ने केले. (Source: Reuters Photo)
-
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षदर्शींनी काढलेल्या व्हिडीओमध्ये गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. लोकांचा मोठा जमाव गोदामात घुसताना आणि पिशव्या आणि बॉक्स बाहेर काढताना दिसत आहे. (Source: Reuters Photo)
-
इस्रायलने गाझावरील ११ आठवड्यांची मदत नाकेबंदी संपवल्यानंतर दहा दिवसांनी ही घटना घडली आहे, ज्यामुळे मर्यादित प्रमाणात मदत पोहोचवता आली. (Source: Reuters Photo)
-
गाझामधील मदत पुरवठा हमासने वळवल्याचा आणि जप्त केल्याचा आरोप इस्रायलने केला आहे, तर हमासने हे आरोप फेटाळून लावले आहेत. (Source: Reuters Photo)
-
संयुक्त राष्ट्रांचे मध्य पूर्वेतील राजदूत सिग्रिड काग यांनी सांगितले की, इस्रायलने संयुक्त राष्ट्रांना मदत पुरविण्याची संधी दिली. ही मदत बुडत्या जहाजाला वाचविणारी महत्त्वाची मदत आहे. अशी तुलना सिग्रिड काग यांनी केली. (Source: Reuters Photo)
-
संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात मदत वितरण पुन्हा सुरू झाल्यापासून, इस्रायलने सुमारे ८०० ट्रक भरलेल्या मदतीला मान्यता दिली आहे. (Source: Reuters Photo)
-
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बुधवारी सांगितले की, गाझामध्ये “अन्न वितरण करण्यावर इस्रायल देखरेख करत आहे.” (Source: Reuters Photo)
-
मंगळवारी GHF कडून मदत मागताना ४७ लोक जखमी झाल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने सांगितले. (Source: Reuters Photo)
-
संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटले की, केरेम शालोम क्रॉसिंगच्या पॅलेस्टिनी बाजूला मदत घेऊन जाणारे ५०० हून कमी ट्रक पोहोचले आहेत. (Source: Reuters Photo)
-
गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन (GHF) द्वारे चालवल्या जाणाऱ्या वितरण स्थळावर, अन्न गोदामाच्या शोधात मोठ्या संख्येने लोक अडथळे पार करत धावत असल्याचे दिसून आले. (Source: Reuters Photo)
युद्धग्रस्त गाझामध्ये संयुक्त राष्ट्रांनी पाठविलेल्या मदतीवर दरोडा
आंतरराष्ट्रीय दबावाखाली, इस्रायलने गाझावर लादलेली ११ आठवड्यांची नाकेबंदी मागे घेतली. ज्यामुळे गाझात आता मानवतावादी मदत पोहोचवली जात आहे.
Web Title: Deadly break in at un warehouse as aid trickles into war torn gaza kvg