-
गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठ्या लष्करी हालचालीत इस्त्रायलने शुक्रवारी पहाटे ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत इराणवर भीषण हवाई हल्ला चढवला. या कारवाईत अणु ठिकाणे आणि लष्करी लक्ष्ये थेट निशाण्यावर घेतली गेली. (एपी फोटो)
-
इराणने आण्विक सुरक्षा उपाययोजनांचे उल्लंघन केल्याचे आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेने (IAEA) जाहीर केल्यानंतर हा हल्ला झाला. दोन दशकांनंतर प्रथमच इराणविरोधात असा ठराव मंजूर करण्यात आला आहे, ज्याने संपूर्ण जागतिक राजकारण हादरून सोडले. (एपी फोटो)
-
पंतप्रधान नेतान्याहू यांनी गंभीर इशारा दिला आहे की, इराणने युरेनियमचे शस्त्रीकरण करण्यासाठी अभूतपूर्व पावले उचलली आहेत. ते म्हणाले की, “बॉम्ब तयार होण्यापूर्वीच इराणला रोखणे अत्यावश्यक आहे.” (एपी फोटो)
-
या जबरदस्त कारवाईत इराणच्या अणुकार्यक्रमाचे प्रमुख केंद्र असलेल्या नतान्झ सुविधेलाही लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर खळबळ माजली आहे. (एपी फोटो)
-
इराणच्या अत्यंत संवेदनशील आणि भूमिगत अणु संवर्धन केंद्र फोर्डोला सुरुवातीला लक्ष्य करण्यात आले नव्हते. मात्र, काही वेळातच तिथेही स्फोट झाल्याची माहिती समोर आली असून, हल्ल्याचे परिणाम किती खोलवर गेले आहेत, यावर जगभरात चर्चा सुरू आहे. (एपी फोटो)
-
या हल्ल्यात इराणी लष्कराच्या कमांड साखळीला मोठा धक्का बसला आहे. जनरल मोहम्मद बघेरी आणि जनरल हुसैन सलामी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे, ज्यामुळे इराणमध्ये खळबळ उडाली आहे. (एपी फोटो)
-
इस्त्रायली हल्ल्यांचा आणखी एक धक्का – इराणचे अणुशास्त्रज्ञही ठार. (एपी फोटो)
-
अमेरिकेसोबतच्या चर्चांचा मुख्य चेहरा अली शामखानी हल्ल्यात ठार. (एपी फोटो)
-
रात्रीच्या अंधारात इस्त्रायलवर १०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव. (एपी फोटो)
-
इराणच्या प्रतिहल्ल्यात इस्त्रायलने अनेक क्षेपणास्त्रांना यशस्वीरित्या अडवले, मात्र काही प्रक्षेपणास्त्रे लक्ष्यापर्यंत पोहोचल्याने तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले. शहरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. (एपी फोटो)
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलच्या हल्ल्यात अमेरिका सहभागी नसल्याचे स्पष्ट केले, पण इराणला ठाम शब्दांत इशारा दिला, “अमेरिकेवर कुठलाही हल्ला झाला, तर अदृश्य शक्तीला जाग येईल.” (एपी फोटो)
Photos : इस्रायल-इराण संघर्षात वाढ; अणु प्रकल्पाशी संबंधित ठिकाणांना केलं लक्ष!
शुक्रवारी सुमारे २०० इस्रायली विमानांनी इराणच्या अणुकार्यक्रमाचे केंद्र असलेल्या नतान्झ सुविधेसह १०० हून अधिक ठिकाणी हल्ला केला तेव्हा ही अडचण सुरू झाली.
Web Title: Photos israel iran conflict escalates nuclear oil sites attacked svk 05