Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. happy birthday president droupadi murmu real name and the special story svk

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं खरं नाव काय? वाचा, नावामागची खास गोष्ट….

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू खरे नाव: भारताच्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे जीवन खूपच मनोरंजक आणि प्रेरणादायी राहिले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की त्यांचे नाव अनेक वेळा बदलले गेले आहे? चला जाणून घेऊया त्यांच्या नावामागील रंजक कहाणी.

June 20, 2025 17:08 IST
Follow Us
  • Draupadi Murmu real name
    1/11

    Happy Birthday President Droupadi Murmu: भारताच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आयुष्य प्रेरणादायी आहे; पण तुम्हाला माहीत आहे का ‘द्रौपदी’ हे त्यांचे मूळ नाव नाही? (एक्सप्रेस फोटो)

  • 2/11

    द्रौपदी मुर्मू यांचा जन्म संथाळ जमातीत झाला. त्यांच्या आजीच्या सन्मानार्थ त्यांचं बालपणीचं नाव ‘दुर्गी तुडू’ असं ठेवण्यात आलं होतं. वडील बिरांची नारायण तुडू हे शेतकरी व गावाचे पारंपरिक सरपंच होते. (एक्सप्रेस फोटो)

  • 3/11

    बालपणी द्रौपदी मुर्मू यांना घरात प्रेमानं ‘बत्ती’ म्हणून हाक मारली जायची. नंतर हेच नाव बदलून ‘पुती’ झालं. ही टोपणनावं त्यांच्या कुटुंबातील जिव्हाळा आणि सांस्कृतिक माया दर्शवतात. (पीटीआय फोटो)

  • 4/11

    द्रौपदी मुर्मू यांचं शिक्षण उपरबेडा गावात सुरू झालं. पुढे भुवनेश्वरला शिक्षणासाठी गेल्यावर महाभारतातील द्रौपदी यांच्या नावप्रेरणेनं त्यांच्या शिक्षिकेनं त्यांचं नाव ‘द्रौपदी’ ठेवलं. (एक्सप्रेस फोटो)

  • 5/11

    द्रौपदी मुर्मू यांनी एका मुलाखतीत सांगितलं, “द्रौपदी हे माझं खरं नाव नव्हतं. माझ्या शिक्षिकेनंच ते दिलं होतं.” त्यांच्या मूळ नावापेक्षा हे नाव शिक्षिकेला अधिक भावलं आणि हेच नाव पुढे त्यांची ओळख बनलं. (एक्सप्रेस फोटो)

  • 6/11

    द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, त्यांच्या नावाची अनेक रूपांतरं झाली. कधी ‘दुर्पदी’, कधी ‘दोर्पदी’. ही गोंधळलेली नोंद शिक्षण व्यवस्थेतील कमतरता आणि त्या काळातील ग्रामीण भागातील वास्तव दर्शवते, जिथे शिक्षक आपल्या सोईनं नावं लिहायचे.(एक्सप्रेस फोटो)

  • 7/11

    द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं की, संथाळ संस्कृतीत नावांना विशेष महत्त्व दिलं जातं. नवजात बाळाला त्याच्या आजी-आजोबांचं नाव देण्याची परंपरा आहे, ज्यामुळे त्यांचं नाव कायम जिवंत राहतं. (पीटीआय फोटो)

  • 8/11

    “मुलगी जन्माला आली, तर तिचं नाव आजीवरून आणि मुलगा झाला, तर त्याचं नाव आजोबांवरून ठेवतात”, असं द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं. त्यामुळेच त्यांचं पहिलं नाव ‘दुर्गी टुडू’ हेही एक सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक होतं.. (एक्सप्रेस फोटो)

  • 9/11

    लग्नापूर्वी त्यांच्या नावात ‘टुडू’ हे आडनाव होतं. पण, १९८० मध्ये श्याम चरण मुर्मू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांनी पतीचं आडनाव स्वीकारलं आणि त्या ‘द्रौपदी मुर्मू’ झाल्या.(एक्सप्रेस फोटो)

  • 10/11

    द्रौपदी मुर्मू यांचं आयुष्य केवळ यशाचं नाही, तर मोठ्या दुःखांनीही भरलेलं आहे. २००९ ते २०१५ या काळात त्यांनी पती, दोन मुलं आणि एक भाऊ अशा जवळच्या व्यक्तींना गमावलं. (एक्सप्रेस फोटो)

  • 11/11

    इतक्या दुःखदायी घटनांनंतरही द्रौपदी मुर्मू यांनी हार मानली नाही. त्यांनी आपलं कर्तव्य निभावलं आणि आज त्या भारताच्या राष्ट्रपती म्हणून देशाची सेवा करीत आहेत. एका साध्या आदिवासी कुटुंबात वाढलेल्या मुलीनं दृढनिश्चय, शिक्षण व आत्मविश्वास यांच्या जोरावर आज सर्वोच्च पद मिळवलं आहे. (एएनआय फोटो)

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi News

Web Title: Happy birthday president droupadi murmu real name and the special story svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.