-
एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर (VT-ANB) च्या अपघातानंतर एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने तपास केला असून प्राथमिक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. अवघ्या ३० सेकंदात घडलेल्या घटनांच्या मालिकेवर अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. १२ जून रोजी अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच, इंधन नियंत्रण प्रणाली ‘RUN’ वरून ‘CUTOFF’ वर अनपेक्षित स्विच झाल्यामुळे दोन्ही इंजिन बंद झाले. तपासकर्त्यांनी घटनेचे सेकंद-दर-सेकंद तपशील जारी केले आहेत.
-
सकाळी ११.१७ वाजता: एअर इंडियाचे ड्रिमलायनर VT-ANB नवी दिल्लीहून अहमदाबादला उतरले. (Photo source: Canva)
-
दुपारी १.१८.३८ वाजता: विमानतळावर बे ३४ वरून सदर विमान निघताना दिसून येते. (Photo source: IE)
-
दुपारी १:२५:१५: क्रू सदस्यांनी टॅक्सी क्लिअरन्सची परवानगी मागितल्यानंतर एअर ट्राफिक कंट्रोलकडून सदर परवानगी दिली जाते. यानंतर विमान रनवे २३ च्या दिशेने जाते. (Photo source: PTI)
-
दुपारी १:३२:०३: विमान ग्राऊंड कंट्रोलकडून टॉवर कंट्रोलकडे हस्तांतरित केले जाते. (Photo source: Canva)
-
दुपारी १:३७:३३: उड्डाणासाठीची परवानगी मिळते. (Photo source: Canva)
-
दुपारी १:३७:३७: उड्डाणासाठी विमान सज्ज होते. (Photo source: Canva)
-
दुपारी १:३८:३९: विमान उड्डाण घेते. (Photo source: PTI)
-
दुपारी १:३८:४२: विमानाने १८० नॉट्स इतका कमाल वेग प्राप्त केला. यानंतर अचानक इंजिन १ आणि इंजिन २ बंद झाले. इंजिनला इंधन पुरवठा करणारे स्विच रन वरून कटऑफवर गेल्यामुळे इंधन पुरवठा खंडित झाला. एका वैमानिकाने दुसऱ्याला विचारले की, तू कटऑफ केलास का? यावर दुसऱ्या वैमानिकाने उत्तर दिले, मी काहीही केले नाही. (Photo source: PTI)
-
दुपारी १:३८:४७: दोन्ही इंजिनचे काम हळूहळू निष्क्रिय होत जाते. रॅटमधून हायड्रॉलिक पॉवर पुरवण्यास सुरुवात होते. (Photo source: PTI)
-
दुपारी १:३८:५२: इंजिन १ चा इंधन कटऑफ स्विच रनवर परत आणला जातो. (Photo source: Reuters)
-
दुपारी १:३८:५६: इंजिन २ चाही इंधन कटऑफ स्विच पूर्ववत करण्यात येतो.परंतु इंजिन २ पुन्हा सुरू होत नाही. (Photo source: Reuters)
-
दुपारी १:३९:०५: एका वैमानिकाने संकट काळातील ‘मेडे, मेडे, मेडे’ असा संदेश दिला. (Photo source: PTI)
-
दुपारी १:३९:११: विमानातील डेटा रेकॉर्डिंग थांबते. याच्यापुढे रेकॉर्डिंग नाही. दुपारी १:४४:४४: विमान कोसळल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विमानतळ परिसरातून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना होतात. (Photo source: Reuters)
विमान अपघातापूर्वी कॉकपिटमध्ये नेमके काय झाले? विमान कोसळण्याचा सेकंदा-सेकंदाचा घटनाक्रम जाणून घ्या
एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर च्या दुर्घटनेनंतर AAIB ने आपल्या प्राथमिक अहवालात सर्व घटनांवर प्रकाश टाकला आहे.
Web Title: Inside the cockpit second by second timeline before air india plane crash in ahmedabad kvg