• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. stampede at vijay rally karur deaths 2025 vijay political rally tragedy tamil nadu stampede news actor vijay rally stampede aam

अभिनेता थलपती विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, अनेकांच्या मृत्यूची भीती; केंद्रीय गृहमंत्रालयाचे चौकशीचे आदेश

TVK Vijay: विजय हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे आणि आता त्याने राजकारणात प्रवेश केला आहे, त्यामुळे त्याच्या रॅलींमध्ये लोक मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत.

Updated: September 28, 2025 09:12 IST
Follow Us
  • Crowd stampede at Vijay’s political rally in Karur kills many people including children
    1/2

    अभिनेता थलपती विजय याच्या राजकीय सभेत शनिवारी मोठी दुर्घटना घडली. सभेला आलेली लोकांची गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये ३५ हून अधिका लोकांचा मृत्यू झाला असून, १५० अधिक जण जखमी झाले आहेत.

  • 2/2

    यातील मृतांमध्ये मुले आणि महिलांचासही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 3/2

    केंद्रीय गृह मंत्रालयाने या घटनेबाबत तामिळनाडू सरकारकडून अहवाल मागितला आहे. गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून, केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.”

  • 4/2

    तामिळनाडूच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

  • 5/2

    या घटनेनंतर थलपती विजयने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दु:ख व्यक्त केले आहे. तो म्हणाला, “ही घटना हृदय पिळवटू टाकणार आहे. मी असह्य असून, वेदना आणि दुःखाने मी थरथर कापत आहे. हे शब्दात व्यक्त करता येत नाही.”

  • 6/2

    विजय हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे आणि आता त्याने राजकारणात प्रवेश केला आहे, त्यामुळे त्याच्या रॅलींमध्ये लोक मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. टीव्हीकेने पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे.

  • 7/2

    चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त करताना, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या पीडितांवर रुग्णालयात योग्य उपचार होत आहेत याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

TOPICS
एम. के. स्टॅलिनMK StalinतमिळनाडूTamil Naduमृत्यूDeath

Web Title: Stampede at vijay rally karur deaths 2025 vijay political rally tragedy tamil nadu stampede news actor vijay rally stampede aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.