-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि समाजसेविका अमृता फडणवीस यांनी ट्रोलर्सबाबत पुन्हा एकदा भाष्य केलं आहे (सर्व फोटो सौजन्य-अमृता फडणवीस फेसबुक पेज)
-
अमृता फडणवीस यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वक्तव्यांसाठी तसंच त्यांच्या गाण्यांसाठी ओळखल्या जातात.
-
गणेश विसर्जनाच्या म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी अमृता फडणवीस यांनी जुहू चौपाटी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली.
-
अमृता फडणवीस यांनी केलेल्या पेहरावावरुन त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. याआधीही त्यांना अशा प्रकारे विविध मुद्द्यांवरुन ट्रोल करण्यात आलं.
-
अमृता फडणवीस यांनी ज्या प्रकारचा पोशाख परिधान केला होता त्यावरुन त्यांना ट्रोल करण्यात आलं. याबाबत अमृता फडणवीस यांना इंडिया टुडे कॉनक्लेव्ह मध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमृता फडणवीस यांनी मला ट्रोलर्समुळे काही फरक पडत नाही असं म्हटलं आहे.
-
अमृता फडणवीस म्हणाल्या “असे अनेक प्रसंग घडले आहेत की सोशल मीडियावर लोक माझ्याबाबत ओव्हर रिअॅक्ट करतात. अशा गोष्टी समोर आणून ते मुख्य मुद्द्यापासून बाजूला होतात, फारकत घेतात. पण मला त्याने फरक पडत नाही.
-
अमृता फडणवीस म्हणाल्या मी गणेश उत्सवानंतर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी स्वच्छता मोहिम राबवली. समाजातले काही घटक, एनजीओ आणि लहान मुलांची साथही आम्हाला लाभली. पर्यावरण पूरक गणपती मूर्ती घरी आणा यासाठीही आम्ही लोकांना संदेश दिला. मात्र ट्रोलर्सनी हा विषय बाजूला ठेवला
-
मला ट्रोलर्समुळे काही फरक पडत नाही मला ठाऊक आहे त्यांना याचे पैसे मिळतात. त्यामुळे हे ट्रोलर्स अशाच पद्धतीने व्यक्त होतात. ट्रोलर्सनी मला ट्रोल केलं, मी समाजसेवा करत होते याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.
-
एक महिला जी व्यवस्थित विचार करु शकते, समस्या समजून घेऊ शकते जिच्याकडे तिचा आवाज आहे, तिचं म्हणणं आहे तिला ट्रोल करायला ट्रोलर्स सरसावणारच. हे फक्त माझ्याबाबतीत नाही प्रत्येक महिलेला लागू पडतं असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.
-
मला हे ट्रोलर्स पार्श्वसंगीताप्रमाणे वाटतात. तुम्ही ते कर्कश्य आहे समजून त्रास करुन घ्यायचा की त्यावर नाच करत ठेका धरायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही त्यांना टाळणं हा चांगला पर्याय आहे, शिवाय तुम्ही त्यांच्या विरोधात आवाजही उठवू शकता. काय करायचं हा शेवटी तुमचा निर्णय असला पाहिजे असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
-
अमृता फडणवीस या सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यांच्या वक्तव्यांची कायमच चर्चा होत असते.
-
अमृता फडणवीस यांनी ट्रोलर्सना जोरदार उत्तर दिलं आहे.
-
अमृता फडणवीस या सोशल मीडियावर कायमच त्यांच्या सक्रिय आहेत.
अमृता फडणवीसांनी ट्रोलर्सना सुनावले खडे बोल, “कपड्यांवरुन ट्रोल करा किंवा कुठल्याही गोष्टीवरुन, मी…”
मिसेस सीएम अमृता फडणवीस यांनी ट्रोलर्सना दिलं उत्तर, म्हणाल्या हवं तितकं ट्रोल करा काही फरक पडत नाही.
Web Title: Amruta fadnavis strong answer to trollers said this things to trollers scj