-
India Vs Pakistan : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर भेदरलेला पाकिस्तान भारताला कधी अणूबॉम्ब टाकण्याची धमकी देतोय, तर कधी लढाऊ विमानांचा माज दाखवतोय. मागील पाच महिन्यांत पाकिस्तानी सात वेळा भारताला धमकी दिली आहे. (AI Generated Image)
-
५ फेब्रुवारी २०२५ : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे एका लष्करी संमेलनात (267th Corps Commanders Conference) म्हणाले, “पलीकडून कुठलीही अनुचित कृती घडल्यास पाकिस्तान प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.” (PC : TIEPL)
-
२८ एप्रिल २०२५ : पाकिस्तानी संरक्षणमंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ म्हणाले होते की “भारताकडून लष्करी कारवाईची शक्यता आहे. परंतु, पाकिस्ताननेही आपलं सैन्य मजबूत केलं आहे. आपल्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रयत्न झाल्यास आपण अण्वस्त्रांचा वापर करू. अशा काळात अण्वस्त्र डागताना कुठलाही संकोच बाळगणार नाही.” (PC : TIEPL)
-
३० एप्रिल २०२५ : पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. त्याअंतर्गत भारताने सिंधू जलकरार स्थगित केला होता. त्यावर पाकिस्तानने म्हटलं होतं की भारत आम्हाला युद्धाचं आमंत्रण देतोय. भारताला योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल. (PC : TIEPL)
-
२ मे २०२५ : पाठोपाठ पाकिस्तानच्या वरिष्ठ नेतृत्वाने भारताला इशारा दिला की “भारताने पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई केली तर त्यांना त्यांच्या भाषेत प्रतिसाद मिळेल.”
-
११ ऑगस्ट २०२५ : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर अमेरिकेत एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, “आमच्या अस्तित्वावर संकट आलं तर आम्ही काहींना सोबत घेऊन जाऊ.” (भारताने पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका निर्माण केला तर आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू). (PC : Wikimedia Commons)
-
५ ऑक्टोबर २०२५ : नकाशावरून पुसून टाकण्याच्या भारताच्या इशाऱ्याला पाकिस्तानने अधिकृत निवेदनाद्वारे उत्तर दिलं. यामध्ये म्हटलं की “अनावश्यक धमक्या आणि कारण नसताना केलेल्या हल्ल्यांना तोंड देताना, पाकिस्तानचे लोक, सशस्त्र सेना शत्रूच्या प्रदेशात लढण्याची क्षमता व दृढनिश्चय बाळगून आहे. भारतात घुसून लढण्याची ताकद पाकिस्तानी लष्कराकडे आहे. या वेळी आम्ही भौगोलिक सीमांमागील धारणा मोडून काढू आणि देशाच्या (भारताच्या) सर्वात दुर्गम भागांत घुसू. पाकिस्तानला नकाशावरून हटवण्याच्या बाबतीत भारताने समजून घेतलं पाहिजे की अशा परिस्थितीचा परिणाम दोन्ही बाजूंना भोगावा लागेल.” (PC : TIEPL)
-
६ ऑक्टोबर : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, “आता युद्ध झालं तर भारत स्वतःच्या लढाऊ विमानांच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल.” (PC : TIEPL)
कधी अणूबॉम्ब तर, कधी लढाऊ विमानांचा माज; पाकिस्तानची पाच महिन्यांत भारताला सात वेळा धमकी
भेदरलेला पाकिस्तान भारताला कधी अणूबॉम्ब टाकण्याची धमकी देतोय, तर कधी लढाऊ विमानांचा माज दाखवतोय. मागील पाच महिन्यांत पाकिस्तानी सात वेळा भारताला धमकी दिली आहे.
Web Title: Pakistan threatens india 7 times in 5 months check all international political statements asc