सपाचे नेते मुलायमसिंह यादव यांचा नातू आणि राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांची कन्या यांच्या लग्न समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. (छायाः एक्स्प्रेस फोटो) -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी मुलायम सिंग यादव यांची भेट घेतली. (छायाः एक्स्प्रेस फोटो)
मोदी आणि मुलायम चर्चा करताना दिसत आहेत. (छायाः एक्स्प्रेस फोटो) यापूर्वी मोदींनी लग्नसमारंभापूर्वीच्या तिलक समारंभालाही उपस्थिती लावली होती. (छायाः विशाल श्रीवास्तव एक्स्प्रेस फोटो) मुलायम सिंग आणि लालू प्रसाद यांनी स्वतः मोदींचे स्वागत केले आणि त्यांचा पाहुणचारही केला. (छायाः विशाल श्रीवास्तव एक्स्प्रेस फोटो) दोन्ही यादव घराण्यातील स्त्रिया मोदींसोबत फोटो काढण्यास उत्सुक होत्या. (छायाः विशाल श्रीवास्तव एक्स्प्रेस फोटो) मोदी यांनी समारंभाला येऊन आशीर्वाद दिले त्याचा राजकीय अर्थ काढण्यात येऊ नये, असे तेजप्रताप तिलक समारंभावेळी म्हणाले होते. (छायाः विशाल श्रीवास्तव एक्स्प्रेस फोटो) नरेंद्र मोदींना पाहून याठिकाणी सपाचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या ते पाहून काहीवेळासाठी सपाचे नेतेही संभ्रमात पडले.(छायाः विशाल श्रीवास्तव एक्स्प्रेस फोटो)
मुलायम-लालूप्रसाद घराण्यांच्या एकत्रीकरणाला मोदींचा ‘आशीर्वाद’!
Web Title: Political rivals modi mulayam share stage at wedding of lalus daughter