• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. tv couples shocking break ups

का रे दुरावा….

Updated: October 6, 2021 17:47 IST
Follow Us
    • नुकतीच टीव्हीवर गाजलेली जोडी दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा यांनी त्यांच्या सात वर्षांच्या नात्याचा शेवट केला. त्यामागे एकमेकांसाठी पुरेसा वेळ नसणं हे एकमेव कारण होतं. यानिमित्ताने याच कारणाने टीव्हीवरील दुरावलेल्या नात्यांवर टाकलेला एक दृष्टिक्षेप..
    • 1/7

      शरद मल्होत्रा- दिव्यांका त्रिपाठीः मालिकेच्या चित्रीकरणामुळे शरद मुंबईबाहेर आणि दिव्यांका मुंबईत. त्यांच्या चित्रीकरणाच्या वेळा, सुट्टय़ांची जुळवाजुळव करण्यात तारेवरची कसरत होऊ लागली आणि दोघांनीही नाइलाजास्तव आलेल्या या दुराव्याला संपवण्याऐवजी नात्यातून बाहेर पडण्याचाच निर्णय घेतला.

    • करण सिंग ग्रोवर- जेनिफरः करण बॉलिवूडमध्ये त्याची जागा बनविण्यासाठी धडपडत होता. तर जेनिफर ‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेमध्ये काम करत होती. त्यात करण आणि बिपाशामधील अफेअर्सच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगविल्या जात होत्या. चित्रीकरण संपवून करण परतला तेव्हा जेनिफरला ‘फिर से’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला जावं लागलं आणि या दरम्यान त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. संवादाअभावी तुटलेल्या या नात्याची खंत करणने स्वत: ट्विटरवरून व्यक्त केली.
    • करण कुंद्रा- कृतिका कामराः एकाच मालिकेत काम करत असताना त्यांच्यात सुत जुळलं. पण, मालिका संपल्यावर दोघंही वेगवेगळ्या मालिकांमध्ये गुंतले गेले आणि नात्यात दुरावा आला. पण, नातं संपलं तरी एकमेकांचे मित्र म्हणून राहण्यास त्यांनी पसंती दिली.
    • करण पटेल- कामया पंजाबीः गेल्याचं वर्षी या दोघे वेगळे झाले असून करण ३ मे रोजी टीव्ही अभिनेत्री अंकिता भार्गव हिच्याशी लग्न करत आहे.
    • अली गोनी- नताशा स्टॅनकोव्हिकः मालिकांच्या चित्रीकरणांचे व्यग्र वेळापत्रक आणि त्यामुळे एकमेकांना वेळ न देता आल्याने तुटलेली अजून एक म्हणजे ‘ये है महोबत्ते’ मालिकेतीलच अली गोनी आणि नताशा स्टॅनकोव्हिक.
    • राहुल महाजन- डिम्पी गांगुलीः राहुल दुल्हनिया ले जाएगा या रिएलिटी शोद्वारे २०१० साली विवाहबंधनात अडकलेले राहुल आणि डिम्पीचा नुकताच घटस्फोट झाला. हे दोघेही बिग बॉस८ मध्ये एकत्र झळकले होते. मात्र, आता आमच्यात केवळ मैत्रीचे संबंध असल्याचे यांचे म्हणणे आहे.
TOPICS
टेलिव्हिजनTelevision

Web Title: Tv couples shocking break ups

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.