-
शुक्रवारी सकाळी ६.२०च्या सुमारास तीन ते चार जणांच्या दहशतवाद्यांच्या टोळक्याने पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरील पहारेकऱ्यांवर गोळीबार केल्याची माहिती कटुहाचे पोलीस उपायुक्त शाहीद इक्बाल चौधरी यांनी दिली. (छाया- पीटीआय)
-
जम्मूच्या कटूहा जिल्ह्यातील राजबाग पोलिस ठाण्यावर शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांच्या आत्मघातकी पथकाने हल्ला चढवला. यावेळी भारतीय सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. त्यापूर्वी आपापली जागा घेण्यासाठी निघालेले भारतीय जवान. (छाया- पीटीआय)
-
हे दहशतवादी पोलीस ठाण्याच्या आतमध्ये लपून बसले असताना बाहेरील पोलीसांशी त्यांची तुफान धुमश्चक्री सुरू होती. (छाया- पीटीआय)
-
सुरक्षा दलांनी दोघा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून अद्याप चकमक सुरु आहे. (छाया- पीटीआय)
-
केंद्रीय गृहखात्याने या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक व मुख्य सचिवांशी चर्चा करुन परिस्थितीची माहिती घेतली आहे. (छाया- पीटीआय)
-
दहशतवादी रात्री सीमा रेषा ओलांडून भारतात आले व त्यांनी हा हल्ला घडवला असावा असा आरोप जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. (छाया- पीटीआय)
-
जम्मूच्या कटूहा जिल्ह्यातील राजबाग पोलिस ठाण्यावर शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांच्या आत्मघातकी पथकाने हल्ला चढवला. यावेळी भारतीय सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली.
-
यावेळी दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार करण्यात येत होता. तेव्हा रस्त्यावर उभे असणारे स्थानिक नागरिक सैरवैरा पळत असताना. (छाया- पीटीआय)
-
दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याच्या पवित्र्यात असलेला भारतीय जवान. (छाया- पीटीआय)
-
ही धुमश्चक्री सुरू असताना झाडामागे उभे राहून परिस्थितीचा अंदाज घेत असताना भारतीय लष्करातील जवान. (छाया- पीटीआय)
-
हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी पोलिस ठाण्याला गराडा घालून कारवाईला सुरुवात केली. या कारवाई दरम्यान दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. (छाया- पीटीआय)
-
भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या गोळीबारामुळे राजबाग पोलिस ठाण्याच्या भिंतींवर असंख्य ठिकाणी गोळ्यांनी खड्डे पडले होते. (छाया- पीटीआय)
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री
Web Title: Terrorists attack jammu police station