
अभिनेते शशी कपूर यांनी नुकताच आपला ७७ वा वाढदिवस साजरा केला. आणि सोमवारी त्यांना चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान जाहीर झाल्याने त्यामुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाला आहे. यानिमित्त त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा घेतलेला आढावा. वयाच्या अवघ्या चौध्या वर्षी शशी कपूर यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांचे वडिल पृथ्वीराज कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमध्ये त्यांनी काम केले. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस) डावीकडून शम्मी कपूर, जेनिफर शशी कपूर, राज कपूर, रामसमी कपूर, नीला शम्मी कपूर, पृथ्वीराज कपूर, कृष्णा राज कपूर, शशी कपूर शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ साली कोलकाता येथे कपूर घरण्यात झाला. त्यांचे मूळ नाव बलबीर राज पृथ्वीराज कपूर असे आहे. शशी कपूर हे राज आणि शम्मी कपूर यांचे सर्वात लहान भाऊ आहेत. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस) शशी कपूर यांची १९५६ साली कोलकत्यात इंग्लिश अभिनेत्री जेनिफर केन्दाल यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी १९५८ साली विवाह केला. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस) हे दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. खासकरून, आयव्होरी निर्मितीअंतर्गत बनलेल्या चित्रपटांमध्ये ते एकत्र झळकले. जेनिफर आणि शशी कपूर यांनी मिळून ५ नोव्हेंबर १९७८ साली पृथ्वी थिएटरची स्थापना केली. त्यांना करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही तीन मुले आहेत. १९८४ साली कर्करोगामुळे जेनिफर यांचे निधन झाले. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस) शशी कपूर यांनी १६० चित्रपटांमध्ये काम केले. यात १२ इंग्रजी आणि १४८ हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस) चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना २०११ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस) वडील पृथ्वीराज कपूर, ज्येष्ठ बंधू राज कपूर यांच्यानंतर सिनेसृष्टीतील हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे शशी कपूर हे कपूर कुटुंबातील तिसरे सदस्य आहेत. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस) संग्राम चित्रपटादरम्यान टिपलेले छायाचित्र. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस) भूमिका विनोदी असो की गंभीर शशी कपूर यांनी आपल्या अभिनयाने व्यावसायिक सिनेमांतही प्रेक्षकांना निखळ आनंद दिला. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस) १९६१ साली प्रदर्शित झालेल्या धर्मपुत्र चित्रपटाने शशी यांनी मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस) १९७० ते १९८० दरम्यान तब्बल ९ चित्रटपटांमध्ये त्यांनी प्राण यांच्यासोबत काम केले. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस) शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांनी तब्बल १२ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस) अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, जितेंद्र, रणधीर कपूर, ऋषी कपूर या आपल्या सहकलाकारांपेक्षा चांगला अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. तसेच, त्यांना इतरांपेक्षा अधिक मानधन मिळत होते. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस) शशी कपूर यांच्य चित्रपटातील एक दृश्य. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस) ७७ वर्षीय शशी कपूर हे आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे सहसा कुठे जात नाहीत. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस) १९९८ साली प्रदर्शित झालेल्या जिन्नाह या चित्रपटात त्यांनी शेवटचा अभिनय केला. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस) शशी कपूर यांनी चित्रपटांमधून आता निवृत्ती घेतली आहे. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस)
शशी कपूर यांना फाळके पुरस्कार
Web Title: Veteran actor shashi kapoor gets dada saheb phalke award