
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि कंगना राणावत या दोघींमध्ये शत्रुत्व आहे ही केवळ अफवा असल्याचे दोघींनी सिद्ध केले आहे. ६२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी या दोघींनी एकत्र पार्टीचे आयोजन केले होते. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी कंगना आणि प्रियांकामध्ये चुरस होती. यात कंगना बाजी मारत राष्ट्रीय पुरस्कार पटकाविला. पण, त्यामुळे या दोघींमध्ये शत्रुत्व आल्याचे अजीबात दिसून आले नाही. याउलट दोघीजणी लहान मुलींप्रमाणे एखत्र हसताना दिसल्या. कंगना राणावतला क्वीन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. प्रियांका चोप्राच्या मेरी कोम या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रसिद्ध चित्रपटाने गौरविण्यात आले. आमिर खानने दिग्दर्शिका झोया अख्तरसह पार्टीला उपस्थिती लावली. श्रद्धा कपूर. वरुण धवन विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर इमरान खान आणि पत्नी अवंतिका मेरी कोम चित्रपटातील प्रियांकाचा नवरा आणि अभिनेता दर्शन कुमार फराह खान आणि शिरीष कुंदर अनुपम खेर सोनू सूद दीपक डोब्रियाल दिनो मोरिया विधू विनोद चोप्रा, संजय लीला भन्साली
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारः प्रियांका, कंगनाचे एकत्र सेलिब्रेशन
Web Title: Queens priyanka chopra kangana ranaut celebrate national award wins together