Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. first look of carry on maratha

फर्स्ट लूक : ‘कॅरी ऑन मराठा’

Updated: October 7, 2021 13:06 IST
Follow Us
  • निस्वार्थ निखळ प्रेमकथा नेहमीच चित्रपटाचा आत्मा राहिल्या आहेत. मग ती कोणत्याही भाषेतील असो वा प्रांतातील अशा चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. अशीच एक अनोखी प्रेम कहाणी 'कॅरी ऑन मराठा'च्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.
    1/11

    निस्वार्थ निखळ प्रेमकथा नेहमीच चित्रपटाचा आत्मा राहिल्या आहेत. मग ती कोणत्याही भाषेतील असो वा प्रांतातील अशा चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. अशीच एक अनोखी प्रेम कहाणी ‘कॅरी ऑन मराठा’च्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.

  • महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर ही प्रेमकथा रंगताना दिसेल. अंधेरीतील ‘द क्लब’ या पंचाताराकीत हॉटेलमध्ये ‘कॅरी ऑन मराठा’ चित्रपटाच्या फर्स्ट लूक लाँचचा डोळे दिपवणारा सोहळा संपन्न झाला.
  • 2/11

    चित्रपटात मार्तंडची व्यक्तिरेखा साकारत असलेल्या गश्मीर महाजनीच्या धमाकेदार एन्ट्रीने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. जुलै २०१५ ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात मनोरंजनाची झकास फोडणी देण्यात आली आहे. जी प्रत्येक घरासाठी आणि घरातील प्रत्येकासाठी आहे. या चित्रपटाद्वारे गश्मीर महाजनी हा देखणा आणि दमदार हिरो मराठी सिनेसृष्ठीत पदार्पण करत आहेत. अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी ही कुसुम नावाच्या एका कानडी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • 3/11

    मार्तंड आणि कुसुम यांच्यात फुलणारी प्रेमकहाणी चित्रपटाचा गाभा आहे. ‘नंदा आर्ट्स’ आणि ‘वॉरीयर ब्रदर्स मोशन पिक्चर्स’ यांची निर्मिती असलेल्या ‘कॅरी ऑन मराठा’ चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लोंढे यांनी केले आहे.

  • 4/11

    संजय लोंढेचे दिग्दर्शन लाभलेल्या ‘कॅरी ऑन मराठा’ चित्रपटात मनोरंजनाची उत्तम भट्टी जमून आली असून सगळ्याच कलाकारांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षक नक्की हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहतील अशी आशा ‘नंदा आर्ट्स’च्या निर्मात्या सौ. नंदा चंद्रभान ठाकूर आणि ‘वॉरीयर ब्रदर्स मोशन पिक्चर्स’च्या निर्मात्या शशिकला क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

  • 5/11

    गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या विषयाचे चित्रपट आले. मात्र ‘कॅरी ऑन…’च्या निमित्ताने कम्प्लिट एंटरटेनमेंट सिनेमा पाहायला मिळेल. महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील विविध भागांमध्ये सिनेमाचे चित्रीकरण झाले आहे. दिगदर्शक म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट आहे. गेल्या १५ वर्षांपासून मी हिंदी मराठी तसेच इतर भाषेतील सिनेमात पडद्याआडूव काम केले आहे. मात्र ‘कॅरी ऑन मराठा’ चित्रपटाद्वारे मी दिग्दर्शकच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत असल्याने माझ्यासाठी हा चित्रपट खूप महत्वाचा असल्याचे चित्रपटाबाबत अधिक माहिती देताना दिग्दर्शक संजय लोंढे म्हणाले.

  • 6/11

    संजय लोंढे यांनी प्रखात दिग्दर्शक अब्बास मस्तान, प्रियदर्शन, आशुतोष गोवारीकर, निखिल अडवाणी यांच्यासोबत काम केले आहे.

  • 7/11

    गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, मंगेश कांगणे, हृदया शिवा यांनी चित्रपटासाठी गीते लिहिली असून शैल आणि प्रीतेश यांनी संगीत दिले आहे.

  • 8/11

    श्रेया घोषाल, आदर्श शिंदे, वैशाली भैसने-माडे, शैल हाडा, उर्मिला धनगर यानी आपल्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी गायली आहेत

  • 9/11

    चित्रपटाला अरुण प्रसाद यांचे छायांकन लाभले असून राजू खान, अदील शेख, सूजीत कुमार यांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. कौशल – मोझेस यांनी साकारलेली हाणामारीची दृष्ये प्रेक्षकांना अचंबीत करणारी अशी झाली असल्याचे बोलले जाते.

  • 10/11

    चित्रपटात मराठीसोबत दक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी अभिनय केला आहे. अरुण नलावडे, अमीन हाजी, करीम हाजी, किशोरी बल्लाळ, देविका दफ्तरदार, उषा नाईक, शंतनू मोघे, समीर खाडेकर, ओमकार कुलकर्णी, अमेय कुंभार आणि सचिन देशपांडे यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला निखळ मनोरंजनात्मक असा हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

TOPICS
मराठी चित्रपटMarathi Movie

Web Title: First look of carry on maratha

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.