• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. mumbai indians celebration at wankhede

मुंबई इंडियन्सचा वानखेडेवर जल्लोष: हरभजनचा अनोखा अंदाज तर सचिनची मराठमोळी साद

वानखेडे स्टेडियमवर जल्लोषपूर्ण वातावरणात मुंबई इंडियन्स संघाचे स्वागत आणि विजयी सेलिब्रेशची क्षणचित्रे..

Updated: October 7, 2021 15:59 IST
Follow Us
  • आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबईने चेन्नई सुपर किंग्जवर मात करत दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली होती. या विजयानंतर सोमवारी मुंबई इंडियन्स संघाकडून एका खास स्वागत सोहळ्याचे आयोजन वानखेडे स्टेडियमवर केले होते. यावेळी आपल्या घरच्या प्रेक्षकांनाही या आनंदात मुंबईच्या संघाने सामावून घेण्याचा प्रयत्न केला.
    1/29

    आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबईने चेन्नई सुपर किंग्जवर मात करत दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली होती. या विजयानंतर सोमवारी मुंबई इंडियन्स संघाकडून एका खास स्वागत सोहळ्याचे आयोजन वानखेडे स्टेडियमवर केले होते. यावेळी आपल्या घरच्या प्रेक्षकांनाही या आनंदात मुंबईच्या संघाने सामावून घेण्याचा प्रयत्न केला.

  • 2/29

    जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संघ मालकीण नीता अंबानी यांच्यासह मुंबईचा संघ मैदानात दाखल झाला आणि चाहत्यांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत केले.

  • 3/29

    संपूर्ण संघाने स्टेडियमला विजयी फेरी मारत चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले.

  • 4/29

    हा कार्यक्रम पूर्वनियोजित नसल्यामुळे क्रिकेट सामन्यांएवढी या सोहळ्याला गर्दी नव्हती. पण प्रत्येक स्टँडमधून उत्साहात संघाचे स्वागत केले जात होते.

  • 5/29

    हरभजनचा अनोखा अंदाज. (पीटीआय)

  • 6/29

    स्वागत फेरी संपल्यावर मैदानाच्या मध्यभागी एक छोटेखानी मंच बनवण्यात आला होता. त्या मंचावर खेळाडूंना एकामागून एक बोलावण्यात आले. खेळाडूंशी संवाद साधण्यात आला

  • 7/29

    मुंबई इंडियन्सच्या हातामध्ये चषक दिल्यावर ‘फटाके’बाजी आणि रोषणाईसह चाहत्यांच्या जल्लोषाने वानखेडे स्टेडियम दणाणून गेले

  • 8/29

    कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाळी मुंबई इंडियन्सच्या संघाने वानखेडेवर विजयी फेरी मारली. (छाया- केव्हिन डिसुझा)

  • 9/29

    हरभजन सिंगने यावेळी बोलताना आपण आता पंजाबी कमी आणि मुंबईकर जास्त झालो असल्याचे मत व्यक्त केले. (छाया- केव्हिन डिसुझा)

  • 10/29

    भारताचा मास्टर-ब्लास्टर माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची जादू अजूनही ओसरली नसल्याचेच मुबंई इंडियन्सच्या या विजयी सोहळ्यात जाणवले. (छाया- केव्हिन डिसुझा)

  • 11/29

    प्रेक्षकांनी मुंबई इंडियन्सपेक्षा ‘सचिन.. सचिन..’ हाच नारा बुलंद केल्याचे पाहायला मिळाले. हरभजननेही त्याला प्रोत्साहात्मक प्रतिसाद दिला. (छाया- केव्हिन डिसुझा)

  • 12/29

    प्रत्येक ठिकाणी सचिनच्याच नावाचा नाद निनादत होता. सचिननेही आपल्या चाहत्यांना नाराज केले नाही. (छाया- केव्हिन डिसुझा)

  • 13/29

    मुंबईकर रोहित शर्मा. (छाया- केव्हिन डिसुझा)

  • 14/29

    या स्वागत सोहळ्यात सचिने प्रेक्षकांना मराठीमध्येच साद घातली. ”नमस्कार मुंबई, तुमच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. तुम्ही प्रत्येकवेळी पाठिशी उभे राहिलात. आनंदाचे असे क्षण आयुष्यात फार कमी येतात आणि तुमच्यासोबत हे सारे साजरे करताना आनंद द्विगुणित होतो,” असे सचिन म्हणाला.

  • 15/29

    सचिन सेल्फी काढतो तेव्हा.. (छाया- दिलीप कागडा)

  • 16/29

    पोलार्डचा विजयी जल्लोष. (छाया- केव्हिन डिसुझा)

  • 17/29

    मुंबई इंडियन्सचे वानखेडेवर सेलिब्रेशन (छाया- दिलीप कागडा)

  • 18/29
  • 19/29
  • 20/29
  • 21/29

    वानखेडेवरील सेलिब्रेशन दरम्यान सचिनची पत्नी अंजली आणि रोहितची होणारी पत्नी रितीका देखील उपस्थित होती. (पीटीआय)

  • 22/29
  • 23/29
  • 24/29
  • 25/29
  • 26/29
  • 27/29
  • 28/29
  • 29/29

Web Title: Mumbai indians celebration at wankhede

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.