-

नगरविकास विभागाच्या वतीने शुक्रवारी सह्य़ाद्री अथितिगृहावर स्वच्छता अभियान राबविण्याच्या संदर्भात कोकण विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित केलेल्या समारंभाला आमिर खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हैदराबाद नेहरु प्राणी उद्यानातील सिंहही शुक्रवारी उष्म्यामुळे सावलीत विसावा घेत होता. (छायाः पीटीआय) बरसणार कधी?…. तीव्र उन्हाळ्यामुळे अंगाची लाहीलाही होत असतानाच मुंबईच्या अवकाशात शुक्रवारी अचानक काळ्या ढगांनी गर्दी केली. त्यामुळे किमान काहीवेळ तरी पावसाळी वातावरण तयार झाले. मात्र, हे वातावरण थोडाच वेळ टिकले. पुन्हा काळे ढग पांगले आणि सूर्य तळपू लागला. (छायाः पीटीआय) आलिशान कारच्या बाजारपेठेत क्रमांक एकवर राहण्याच्या ईर्षेने बीएमडब्ल्यूने गुरुवारी आपल्या नव्या कराच्या सादरीकरणाचा अभिनव मार्ग चोखाळला. कंपनीने तिच्या ६ सीरिज मालिकेतील ग्रँन कूप ही कार नवी दिल्ली येथे भरलेल्या इंडिया ब्रायडल फॅशन वीकमध्ये नवरीचे वस्त्र ल्यालेल्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या सादरीकरणासह प्रस्तुत केली. (छायाः पीटीआय)
३० मे २०१५
Web Title: 30 may