
केईएम रुग्णालयात ४२ वर्षे कोमात असलेल्या आणि काही दिवसांपूर्वीच मरण पावलेल्या परिचारिका अरुणा शानबाग यांच्यावर हल्ला करणाऱा हल्लेखोर उत्तर प्रदेशात मजुरीचे काम करीत असल्याचा दावा एका स्थानिक मराठी वृत्तपत्राने काही दिवसापूर्वी केला. (छायाः गजेंद्र यादव) ज्या दिवशी अरुणावर हल्ला झाला त्या दिवशी काय घडले हे त्याला स्मरत नाही, असे त्याचे म्हणणे असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. (छायाः गजेंद्र यादव) -
अरुणा शानबागवर अत्याचार केल्याने त्याला गावाने, नातेवाइकांनी आणि अगदी पत्नीनेही झिडकारले. रोज सकाळी ३० किलोमीटर तो सायकल दामटत जातो. (छायाः गजेंद्र यादव)
आपण अरुणावर बलात्कार केलाच नसल्याचे त्याने यावेळी म्हटले. (छायाः गजेंद्र यादव) सोहनलालचा मोठा मुलगा रविंद्र म्हणाला की, मला माझ्या आईने मी १२ वर्षांचा असत्याना वडिलांच्या खटल्याबाबत सांगितले. ती म्हणाली, मी वडिलांना माफ करायला हवे. माध्यमे त्यांनी केलेल्या गुन्ह्याला वेगळचं रुप देत आहेत. (छायाः गजेंद्र यादव) सोहनलालचा मोठा मुलगा. पुण्यातील येरवडा तुरुंगात सोहनलालने कारावास भोगला होता. (छायाः गजेंद्र यादव) सोहनलाल हा दोन मुले आणि सुना, नातवंडांसोबत राहतो. (छायाः गजेंद्र यादव) म्हातारपणीही कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी वणवण करावी लागणारा सोहनलाल आजाराने खंगला आहे. (छायाः गजेंद्र यादव)
अरुणा शानबागचा हल्लेखोर सोहनलाल उत्तर प्रदेशात
केईएम रुग्णालयात ४२ वर्षे कोमात असलेल्या आणि काही दिवसांपूर्वीच मरण पावलेल्या परिचारिका अरुणा शानबाग यांच्यावर हल्ला करणाऱा हल्लेखोर उत्तर प्रदेशात मजुरीचे काम करीत असल्याचा दावा एका स्थानिक मराठी वृत्तपत्राने काही दिवसापूर्वी केला.
Web Title: Living with 42 years of guilt meet aruna shanbaugs assailant sohan lal