-

गुजरातच्या जामनगरमध्ये रविवारी रात्री एका लोकसंगीताच्या कार्यक्रमात चक्क साडेचार कोटी रूपये उधळले गेल्याचे समोर आले आहे. (छाया-पीटीआय)
-
जामनगर जिल्ह्याच्या कालावड येथे कीर्तिदान गढवी आणि माया आहिर यांच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमात साडेचार कोटी रूपये उधळले गेले. (छाया-पीटीआय)
-
आफ्रिकेत राहणा-या पटेल परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून जमा झालेली सर्व रक्कम ही गावांच्या विकासासाठी वापरली जाणार आहे, असे आयोजकांचे म्हणणे आहे. (छाया-पीटीआय)
-
सौराष्ट्रमध्ये अशा प्रकारचे लोकसंगीताचे कार्यक्रम नवीन नाहीत. परंतु, आजवर कोणत्याही लोकसंगीताच्या कार्यक्रमात उधळल्या गेलेल्या पैशांमध्ये ही सर्वात मोठी रक्कम म्हणावी लागेल. (छाया-पीटीआय)
-
कार्यक्रमादरम्यान ५००, १००, ५०, २० ाणि १० रूपयांच्या नोटा उधळल्या गेल्या. (छाया-पीटीआय)
लोकसंगीताच्या कार्यक्रमाला एका रात्रीत ४.५ कोटींची उधळण
गुजरातच्या जामनगरमध्ये रविवारी रात्री एका लोकसंगीताच्या कार्यक्रमात चक्क साडेचार कोटी रूपये उधळले गेल्याचे समोर आले आहे.
Web Title: 4 5 crore rupees showered at religious song programme in jamnagar