-
जून महिना उजाडला की नेमेचि येणाऱ्या पावसाबरोबरच सण आणि उत्सवांचीही सुरुवात होते. भारतीय समाज निसर्गपूजक मानला जातो. आपल्या सर्व सणांमागची मूळ प्रेरणा निसर्गाशी निगडित असतात. अक्षय्यतृतीयेला संपलेली सणांची मालिका जून महिन्यात पुन्हा सुरू होते. त्यातील पहिला सण असतो वटपौर्णिमा. (छाया-दीपक जोशी)
-
आपल्याकडे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्टय़ा वडाच्या झाडाला फारच महत्त्वाचे स्थान आहे. वट सावित्रीच्या कथेत तर वडाला देवाचे स्थान देण्यात आले आहे. सध्या जागतिक तापमान वाढीने निसर्गचक्राचा समतोल बिघडलेला असताना वटवृक्षांचे पर्यावरणीय महत्त्वही अधोरेखित झाले आहे. (छाया-दीपक जोशी)
-
भारतीय संस्कृती आणि अध्यात्मात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वृक्षाच्या पानांवर भगवान श्रीकृष्णाचा वास असतो, असे मानले जाते. (छाया-दीपक जोशी)
-
पती-पत्नीचे नाते चिरंतन राहावे म्हणून महिला मनोभावे वटवृक्षाची पूजा करतात. या पूजेला सत्यवान सावित्रीच्या कथेचा आधार आहे. (छाया-दीपक जोशी)
-
या वृक्षाच्या घनदाट सावलीमुळे अनेक मंदिरे यांच्या छायेखाली बांधलेली आढळून येतात. त्यामुळे मंदिराबरोबरच या वृक्षाशीही अनेकांचे भावनिक नाते जुळलेले असते. (छाया-दीपक जोशी)
-
शहरी भागात वेळ नाही म्हणून किंवा वेळ वाचविण्यासाठी म्हणून वडाच्या झाडाच्या फांदीचे पूजन करण्याचे फॅड वाढीस लागलेले आहे. धार्मिकदृष्टय़ाही ते योग्य नाहीच, शिवाय पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही फांदीची पूजा अयोग्य ठरते. (छाया-दीपक जोशी)
वटपौर्णिमा
भारतीय संस्कृती आणि अध्यात्मात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वृक्षाच्या पानांवर भगवान श्रीकृष्णाचा वास असतो, असे मानले जाते. पती-पत्नीचे नाते चिरंतन राहावे म्हणून महिला मनोभावे वटवृक्षाची पूजा करतात. या पूजेला सत्यवान सावित्रीच्या कथेचा आधार आहे.
Web Title: Vata pournima pooja celebration