-
माशायोशी मात्सुमोटो या जपानी कलाकाराने फुग्यांच्या सहाय्याने डोळ्यांवर विश्वास बसणार नाहीत अशा विविध प्राण्यांच्या कलाकृती साकारल्या आहेत.
-
विशेष म्हणजे या कलाकृती तयार करताना फुगे एकमेकांशी जोडण्यासाठी गम किंवा चिकटपट्टीचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही.
-
-
प्रत्येक प्राण्याच्या नैसर्गिक स्वभाव त्यांच्या डोळ्यांमधून स्पष्टपणे दिसत आहे. केशरी रंगाचा हा डायनोसॉर त्याचे उत्तम उदाहरण आहे.
ओ डिअर…! -
राजहंसाला शोभेल अशा गुलाबी, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचा या कलाकृतीमध्ये अफलातून वापर करण्यात आला आहे.
-
फुग्यांनी बनवलेला हा उंदीर अगदी जिवंत भासत आहे.
-
प्रथमदर्शनी हे सर्व प्राणी फुग्यांच्या सहाय्याने बनविण्यात आले आहेत, यावर तुमचा विश्वास बसणार नाही.
-
या कलाकृतीमध्ये पक्षी, त्याचे घरटे आणि घरट्यातील अंडी फुग्यांच्या सहाय्याने उत्तमरित्या साकारण्यात आली आहेत.
-
एरवी तुम्ही गवतामध्ये पाहिलेला नाकतोडा आणि या फुग्यांच्या नाकतोड्यामध्ये फरक करणे खूप अवघड आहे.
-
फुग्यांनी तयार करण्यात आलेले हे कासव खूपच आकर्षक दिसत आहे.
फुग्ग्यांची गंम्मत
माशायोशी मात्सुमोटो या जपानी कलाकाराने फुग्यांच्या सहाय्याने डोळ्यांवर विश्वास बसणार नाहीत अशा विविध प्राण्यांच्या कलाकृती साकारल्या आहेत.
Web Title: Believe it or not these animals are made of balloons