-

काळबादेवीतील आगीचे प्रकरण ताजे असतानाच शनिवारी पवईत आणखी एक भीषण अग्नितांडव घडले. (एक्स्प्रेस फोटो)
-
लघुपथनामुळे (शॉर्ट सर्किट) ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (एक्स्प्रेस फोटो)
-
पवईच्या चांदिवली येथील ‘लेक होम’ या २२ मजली इमारतीच्या १४ व्या मजल्याला लागलेल्या आगीत सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला तर २८ जण गंभीर जखमी झाले. (एक्स्प्रेस फोटो)
-
मृतांमध्ये पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सर्व जखमींवर पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (एक्स्प्रेस फोटो)
-
आगीमुळे इमारतीत धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे इमारतीतून बाहेर पडणाऱ्या लोकांना श्वसनाचा त्रास होत होता. (एक्स्प्रेस फोटो)
-
काही लोकांनी उद्वाहनातून (लिफ्ट) खाली येण्याचा प्रयत्न केला. परंतु उद्वाहनातील धुरामुळे गुदमरून त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. (एक्स्प्रेस फोटो)
-
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी इमारतीचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. (एक्स्प्रेस फोटो)
-
वातानुकूलन यंत्रात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. क्षणार्धातच आग १५व्या मजल्यापर्यंत पसरली त्यामुळे रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली. (एक्स्प्रेस फोटो)
पुन्हा एक भीषण अग्नितांडव…
चांदिवलीतील पवई फार्मा मार्गावर ‘लेक होम’ इमारत आहे. शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास इमारतीच्या १४ व्या मजल्यावरील १४०३ क्रमांकाच्या सदनिकेला आग लागली.
Web Title: Seven die in mumbai high rise pawai fire