-

पहिल्या सेटमध्ये नेहमीच्या झंझावाती पद्धतीने खेळत सेरेनाने ४-२ अशी भक्कम आघाडी घेतली. (छाया: पीटीआय)
-
व्यावसायिकतेचा नमुना सिद्ध करत सेरेनाने ही लढत ६-३, ६-७ (२-७), ६-२ अशी जिंकली. (छाया: पीटीआय)
-
अथक मेहनतीची जोड देत, दुखापतींचे काटेकोर व्यवस्थापन केल्याने सेरेनाचा विजयरथ तिशीनंतरही वेगाने दौडतो आहे. (छाया: पीटीआय)
-
दुसऱ्या सेटमध्ये तिच्या खेळातली एकाग्रता हरवली. स्वैर सव्र्हिस, परतीचे फटके खेळताना झालेल्या चुका याचा फायदा उठवत साफारोव्हाने आगेकूच केली. (छाया: पीटीआय)
-
या जेतेपदासह सेरेना सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपद विजेत्या महिला खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. (छाया: पीटीआय)
-
वय वर्षे ३३.. विविध दुखापतींनी शरीराला वेढा दिलेला.. मात्र जिंकण्याची उर्मी जिवंत असेल तर यशोशिखरही पादाक्रांत होऊ शकते, याचा प्रत्यय सेरेना विल्यम्सने दिला.. (छाया: पीटीआय)
-
उपजत प्रतिभेला अथक मेहनतीची जोड देत, दुखापतींचे काटेकोर व्यवस्थापन केल्याने सेरेनाचा विजयरथ तिशीनंतरही वेगाने दौडतो आहे. (छाया: पीटीआय)
-
अंतिम लढतीपर्यंतच्या वाटचालीत मारिया शारापोव्हा आणि अॅना इव्हानोव्हिकला नमवणाऱ्या ल्युसीने पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याचे दडपण न घेता सेरेनाला टक्कर दिली. (छाया: पीटीआय)
सेरेनाचा नाटय़मय ग्रँड विजय..
संपूर्ण स्पर्धेत एकही सेट न गमावत अंतिम फेरीत धडक मारणारी ल्युसी सेरेनाला चीतपट करत चमत्कार घडवणार का, अशा चर्चा सामना सुरू होईपर्यंत रंगल्या होत्या.
Web Title: Serena williams clinches 20th grand slam title after french open win