• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. sugar salt ani prem will tell the tale of three women

‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’

Updated: October 7, 2021 18:23 IST
Follow Us
  • महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी सरकारी योजनांच्या घोषणा... अमलबजावणीचा वर्षाव दरवर्षी होत असतो. पण त्यामुळे खरंच महिलांवरील अत्याचार थांबलेत का... की, त्या सक्षम झाल्या आहेत? तर या साऱ्यांची उत्तरं ‘नाही’ अशीच येतील. त्याकरिता नितांत गरज आहे ती महिलांनी स्वतः खंबीरपणे उभं राहण्याची, आपल्यातला आत्मविश्वास जागृत करण्याची. हीच बाब अचूक हेरत निर्मात्या-दिग्दर्शिका सोनाली बंगेरा आजच्या काळाशी सुसंगत विषयावर आधारलेला ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’ हा चित्रपट घेऊन आल्या आहेत.
    1/7

    महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी सरकारी योजनांच्या घोषणा… अमलबजावणीचा वर्षाव दरवर्षी होत असतो. पण त्यामुळे खरंच महिलांवरील अत्याचार थांबलेत का… की, त्या सक्षम झाल्या आहेत? तर या साऱ्यांची उत्तरं ‘नाही’ अशीच येतील. त्याकरिता नितांत गरज आहे ती महिलांनी स्वतः खंबीरपणे उभं राहण्याची, आपल्यातला आत्मविश्वास जागृत करण्याची. हीच बाब अचूक हेरत निर्मात्या-दिग्दर्शिका सोनाली बंगेरा आजच्या काळाशी सुसंगत विषयावर आधारलेला ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’ हा चित्रपट घेऊन आल्या आहेत.

  • तीन मैत्रीणींच्या निस्वार्थ मैत्रीची सहज-सुंदर कथा सांगणारा ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’१२ जूनपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
  • 2/7

    आज स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीने काम करत, देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा उचलताना दिसतात. प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या स्त्रियांचं आपलं एक विश्व आहे. प्रत्येकीचा आपला एक मैत्रीणींचा ग्रुप आहे. हाच ग्रुप एकमेकींच्या सुख दुःखात मागे पुढे खंबीरपणे उभा राहून जीवनातील प्रत्येक लढाई समर्थपणे लढण्यास त्यांना पाठबळ देत असतो.‘शुगर सॅाल्ट आणि प्रेम’ हा सिनेमा अशाच तीन मैत्रीणींभोवती सोनाली कुलकर्णी, शिल्पा तुळसकर आणि क्रांती रेडकर यांवर गुंफला आहे.

  • अजिंक्य देव, समीर धर्माधिकारी, प्रसाद ओक आणि यतीन कार्येकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाद्वारे रसिकांसमोर येत आहे.
  • 3/7

    अभिषेक जावकर व गुरुनाथ मिठबावकर प्रस्तुत व आरात्रिका एंटरटेनमेंट प्रा.लि यांच्या संयुक्त विद्यमानेया चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

  • गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेल्या या गीतरचनांना सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल शृंगारपुरे यायुवा संगीतकार जोडीने संगीत दिलं आहे.
  • 4/7

    ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’१२ जूनपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Web Title: Sugar salt ani prem will tell the tale of three women

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.