-

मुंबईच्या मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल सध्या सायकलीवरून समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालताना दिसत आहेत. मरिनड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव, वरळी सी फेस, शिवाजी पार्क, वांद्रे आणि जुहू येथील समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालण्यासाठी मुंबई पोलीस दलातर्फे ८ बीच बाईक आणि १६ स्ट्रीट बाईकची खरेदी करण्यात आली आहे. (छाया- वसंत प्रभू)
-
कोलकाता शहरात दुपारच्या वेळेत भेळविक्रेता वामकुक्षी घेत असताना या कावळ्यासाठी मेजवानीची आयतीच संधी चालून आली होती. (छाया- पीटीआय)
आसामच्या नागाव जिल्ह्यातील बिनापानी परिसरातील हा रस्ता पुरामुळे दिसेनासा झाला आहे. (छाया- पीटीआय) -
आसामच्या बसका जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे रस्ता दिसेनासा झाला असून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्याचा अंदाज घेत मार्गक्रमणा करावी लागत आहे. (छाया- पीटीआय)
-
जर्मन बनावटीची आलिशान कार उत्पादक कंपनी मर्सिडीज बेन्झच्या पुण्यातील चाकण येथील ‘फेझ-२’ प्लांटच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी मर्सिडीज बेन्झ स्वत: चालवली. (छाया – मर्सिडिज बेंन्झ इंडिया टि्वटर अकाऊंट)
११ जून २०१५
Web Title: 11 june