-

उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा आज सोमवारपासून पुन्हा एकदा सुरू झाल्या. (छाया- दिपक जोशी)
-
नवीन शैक्षणिक वर्षांची सुरुवात उत्साहात व्हावी यासाठी शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. (छाया- दिपक जोशी)
-
पावसाची सर कायम असूनही विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अनुभवण्याचा उत्साह कायम होता. नवे कपडे, नवा रेनकोट घालून चिमुकली मंडळी शाळेच्या दिशेने आपल्या सवंगड्यांसह पावसाची मजा घेत जात होती. (छाया- दिपील कागडा)
-
वाहनांच्या गर्तेत हरवलेल्या शहरातून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मदत करणारा वाहतूक पोलीस अधिकारी. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
शाळेच्या पहिल्या दिवशी पार्थनेसाठी उभे असलेले चिमुकले. (छाया- दिलीप कागडा)
-
आपल्या चिमुकल्याचा शाळेतील पहिला दिवस असल्याने पालक देखील विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी आवर्जुन उपस्थित होते. (छाया- दिपक जोशी)
-
शाळेचा पहिला दिवस चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्यात प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होेते. (छाया- दिपक जोशी)
-
सेल्फीच्या क्रेझने सर्वांना वेड लावगले आहे. शाळेच्या पहिल्या दिवसाचा उत्साह आणि महत्त्व ओळखून शाळेत जाणाऱया आपल्या चिमुकलीसोबत तिच्या आईने सेल्फी टीपला. (छाया- दिपक जोशी)
-
पहिलाच दिवस असल्याने शाळेतील वातावरणाशी जुळवून घेण्यास काहींना वेळ लागतो. पालक आपल्याला शाळेत सोडून गेल्याने आणि सुरूवातीला कोणाशी ओळख नसल्याने काही चिमुकल्यांना असे रडू कोसळते. (छाया- दिपीक जोशी)
-
तर, काही चिमुकले नव्या अनुभवासाठी नेहमी हसतमुखाने सज्ज असलेली पाहायला मिळतात. (छाया- दिपक जोशी)
-
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत गोड पदार्थानी केले गेले. इतकेच नव्हे तर शिक्षणमंत्रीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. (छाया- दिलीप कागडा)
-
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुंबईतील अनेक शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी रविवारीच तयारी करून ठेवली होती. (छाया- दिलीप कागडा)
-
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विनोद तावडे. (छाया- दिलीप कागडा)
-
चिमुकल्यांशी गप्पागोष्टी करताना विनोद तावडे. (छाया- दिलीप कागडा)
-
विनोद तावडे यांनी मुंबईसह राज्यभरातील विद्यार्थ्यांशी पहिल्या दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. (छाया- दिलीप कागडा)
शाळेला चाललो आम्ही..
उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा आज सोमवारपासून पुन्हा एकदा सुरू झाल्या. (छाया- दिपक जोशी)
Web Title: First day excitement at school