-

मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन्स या संघटनेने बुधवारी पुकारलेल्या रिक्षासंपामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, रिक्षाचालकांना यानिमित्ताने निवांतपणे आराम करण्याची संधी मिळाली.
-
आलिशान हॅचबॅक श्रेणीतील व्हॉल्वोचे ‘व्ही ४०’ हे नवे रूप गुरुवारी हैदराबाद येथे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक टॉम वोन बॉनस्ड्रॉर्फ यांनी सादर केले. दोन प्रकारांत उपलब्ध या कारची किंमत २४.७५ ते २७.७० लाख रुपयांदरम्यान आहे. आलिशान महागडय़ा कारच्या क्षेत्रात व्हॉल्वो ही स्वीडिश कंपनी स्थिरावू पाहत असून, भारतात तिच्या पाच प्रकारच्या कार उपलब्ध आहेत.
-
मुंबईत पावसाने बुधवारीही सुखद हजेरी लावली होती. या पावसाचा हौशी मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊन आनंद लुटला. ( छाया- प्रशांत नाडकर)
-
राजकीय नेते, प्रशासक आणि माजी क्रिकेटपटू यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या द्वैवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (१७६ मते) यांनी ‘क्रिकेट फर्स्ट’च्या विजय पाटील (१४२) यांना ३४ मतांनी हरवून सातव्यांदा अध्यक्षपदावर आपले नाव कोरले. (छाया- केविन डिसोझा)
-
<a href=”https://www.loksatta.com/krida-news/bangladesh-india-one-day-series-start-today-1114569/”> भारत-बांगलादेश एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. (ग्राफिक -पीटीआय) </a>
-
भारतातील सर्वश्रेष्ठ वास्तुरचनाकार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले ज्येष्ठ नगररचनातज्ज्ञ चार्ल्स कोरिया यांच्यावर गुरूवारी दादर येथील पोर्तुगीज चर्चजवळील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (छाया – प्रशांत नाडकर)
-
भारत विरीध्द बांगलादेश एकदिवसीय सामन्यात तमीम इक्बाल ६० धावांवर बाद झाला. अश्विनने त्याला बाद केले. (छाया- एपी/पीटीआय)
-
मुंबईत गुरूवार सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रस्त्यावरदेखील पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी झालेली पहायला मिळत आहे. (छाया – वसंत प्रभू)
-
बुधवारी मध्यरात्री दुरूस्तीचे काम सुरू असताना ठाणे आणि ऐरोली या स्थानकांदरम्यान, पारसिक बोगद्याजवळ दुरूस्ती वाहन अडकून पडल्यामुळे ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही दिशेची वाहतूक गुरूवारी सकाळी ठप्प झाली होती. (छाया- नरेंद्र वास्कर)
१८ जून २०१५
Web Title: 18 june