-

उत्तर अर्धगोलार्धातील सर्वात मोठा दिवस म्हणून आत्तापर्यंत ओळख असलेल्या २१ जूनला यंदाच्या वर्षांपासून योगदिवसाचा दर्जा मिळणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ११ डिसेंबर २०१४ रोजी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले. जगभरामध्ये आज हा दिवस साजरा करण्यासाठी योगप्रेमी सरसावले आहेत. तर संपूर्ण देश विविध कार्यक्रमांसाठी योगसज्ज झाला आहे. योगदिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी नवी दिल्लीतील राजपथावर भव्य योगसोहळ्याची तयारी पूर्ण करण्यात आली. (छाया: पीटीआय)
-
हवामान खात्याने शनिवारी मुंबईमध्ये भरतीवेळी मोठ्या उंचीच्या लाटा येणारह असल्याचा अंदाज वर्तवला होता. असे असताना देखील मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांवर पावसात भिजण्याच्या आनंद घेतला. (छाया: पीटीआय)
-
ज्योती अमगे या जगातील सर्वात छोट्या महिलेने शनिवारी ‘जागतिक योग दिना’च्या पुर्वसंधेला नागपूर येथे योगा वर्गाला हजेरी लावली होती. (छाया: पीटीआय)
-
वायुसेना प्रमुख अरूप राहा यांनी शनिवारी हैद्राबाद मधील वायुसेना अकादमीमध्ये पारपडलेल्या पदविदान संचलनामध्ये महिला कॅडेटचे अभिनंदन केले. (छाया: पीटीआय)
२१ जून २०१५
Web Title: 21 june