• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. monsoon trekking destinations near mumbai that should be on every trekkers list

मान्सून ट्रेकींगसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट ठिकाणे

पाऊस सुरू झाला, की भटक्या मंडळींना गड किल्ल्यांचे वेध लागतात. पाऊस आणि ट्रेकर्स यांचं नातं जिवाभावाचं. शहरात पावसावर खूप राग धरणारे ट्रेकर्स सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर पावसाशी अगदी मुक्तपणे खेळतात. मनसोक्त भिजून घेतात, शहरामध्ये ऑफिस-कामामुळे पावसाला दूर ठेवल्याची सगळी भरपाई करून घेतात. तसं पाहायला गेलं तर पावसाच्या जलधारांमुळे सीमेंटच्या अगदी कंपाऊंड वॉललाही जिथे हिरवे कोंब फुटतात, तिथे…

Updated: October 8, 2021 14:00 IST
Follow Us
    • पाऊस सुरू झाला, की भटक्या मंडळींना गड किल्ल्यांचे वेध लागतात. पाऊस आणि ट्रेकर्स यांचं नातं जिवाभावाचं. शहरात पावसावर खूप राग धरणारे ट्रेकर्स सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर पावसाशी अगदी मुक्तपणे खेळतात. मनसोक्त भिजून घेतात, शहरामध्ये ऑफिस-कामामुळे पावसाला दूर ठेवल्याची सगळी भरपाई करून घेतात. तसं पाहायला गेलं तर पावसाच्या जलधारांमुळे सीमेंटच्या अगदी कंपाऊंड वॉललाही जिथे हिरवे कोंब फुटतात, तिथे डोंगरातल्या अस्सल गावरान मातीची काय कथा? अवघ्या धरती-डोंगर-पठारे-राने-उतार-किल्ले-बुरूज-माच्या, इतकंच काय, मंदिरांच्या कळसांवरही नवचतन्याची हिरवी शाल पांघरली जाते. याचा आनंद अनुभवण्यासाठी आम्ही काही ट्रेकिंगची ठिकाणे सुचवली आहेत.
    • पुण्याहून नसरापूर मार्गे वेल्हे ६८ किलोमीटर. स्वारगेटहून वेल्हय़ासाठी थेट एस. टी. बससेवा आहे. स्वत:चे वाहन असेल तर आता पुण्याहून पानशेत रस्त्यावरून पाबे घाटमार्गेही वेल्हय़ाला जवळच्या रस्त्याने जाता येते. वेल्हे हे आजचे तालुक्याचे ठिकाण, पण पूर्वी भोर संस्थानच्या काळात प्रचंडगड हा तालुका होता आणि वेल्हे ही त्याची बाजारपेठ होती. काळाने हे चक्र पूर्ण उलटे फिरवले. तोरण्याच्या उभ्या पर्वताला भिडण्यापूर्वीच काही टेकडय़ांचा खेळ अगोदर पार पाडावा लागतो. एक चढली की दुसरी, मग तिसरी असे हे टेकडय़ांचे कंटाळवाणे खाली-वर होते. मग यानंतर आपण मुख्य डोंगराला भिडतो. तोरण्याची उंची ४६०६ फूट आणि सारी वाट उभ्या धारेवरची.
    • ३५८० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. पूर्वीच्या मावळ पद्धतीप्रमाणे लोणावळ्याच्या जवळ असलेल्या ‘पवन’ मावळत असलेला हा एक देखणा किल्ला आहे. याच किल्ल्याच्या परिसरात पावना धरण, तुंग किल्ला, लोहगड विसापूर हे किल्ले आहेत. किल्ल्याच्या माथ्यावरून हा सर्व परिसर अप्रतिम दिसतो. विशेषतः इथून दिसणारा तुंगच्या किल्ल्याचा नजरा म्हणजे अप्रतिमच. जणू काही आपण स्वर्गात आहोत असेच वाटते. या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची अदमासे ३५८० फुट आहे. पुण्या मुंबईतून सहज एक दिवसात पाहून होईल असा हा किल्ला आहे.
    • 1/13

      सिंहगड किल्ला (संग्रहित छायाचित्र)

    • अकोले तालुका डोंगरदर्‍यांनी अतिशय समृद्ध आहे. या गिरीकुहरामधे वसलेल्या अनेक दुर्गरत्नांमधे रतनगड हा किल्ला आहे. रतनगडाचा किल्ला भंडारदरा धरणाच्या मागे म्हणजे पश्चिमेला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर उठावलेला आहे. रतनगडाच्या उजवीकडे म्हणजे उत्तरबाजुला असलेला सुळका रतनगडाचा खुटा म्हणून ओळखला जातो. रतनगड आणि खुटा भंडारदरा धरणावरुन उत्तम दिसतात. नाशिक जिल्ह्यात घनचक्कर रांगेत, प्रवरा नदीचा उगमस्थान असलेला हा किल्ला आहे. भंडारदरा धरणामुळे सधन आणि सुपीक झालेला हा प्रदेश आहे. एकीकडे घनदाट जंगल आणि दुसरीकडे भंडारदर्‍याचा विस्तीर्ण जलाशय असा हा निसर्गरम्य परिसर आहे.
    • 2/13

      शिवछत्रपतींच्या वास्तव्याने पुनित झालेला राजगड म्हणजे अवघ्या मराठी माणसाच्या दृष्टीने उत्तुंगतेचा, पराक्रमाचा परमावधी! पण राजगड त्याहीपलीकडे जाऊन आपल्या राकटपणाची मोहिनी घालत राहतो. गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. १.गुप्तदरवाज्याने राजगड: पुणे – राजगड अशी एस.टी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते.बाबुदा झापा पासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत.यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते.यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.

    • 3/13

      अष्टविनायकांपकी एक अशा प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पाली गावाचा पहारेकरी असलेला हा सरसगड! स्थानिक लोक याला सुधागड असेही मानतात. सुधागड हा वेगळा किल्ला असून तो पालीपासून दहा किमीवर आहे. सोपी वाट, एका दिवसात फिरून होण्यासारखा विस्तार यामुळे सरसगड पावसाळ्यातही आवर्जून भेट दिला जाणारा किल्ला आहे. गडाच्या अंतिम टप्प्यातल्या पायऱ्यांवरून पाणी वेगाने उतरत असताना तिथून उतरण्याची साहसी कल्पना प्रत्यक्षातही तितकीच थरारक आहे. तेव्हा खबरदारी घेणे आलेच! गडाला एक चोरदरवाजाही असून त्याची वाट सरसगडाच्या डाव्या टोकाखालच्या पठारावरून निघते. माहीतगार माणूस सोबत असेल आणि कातळावरून पाणी वाहत असताना पाऊल टाकायची सवय असेल तर ही वाट नक्की ट्राय करावी.

    • 4/13

      किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १७०० पायऱ्या आहेत.जून ते ऑगस्ट दरम्यान पावसाळ्यात रायगडाची सफर केल्यास आपण जणू ढगातूनचं चालत आहोत असे वाटते.

    • 5/13

      मुंबई आणि पुण्याहून एका दिवसात जाऊन येण्यासारखा हा किल्ला आहे. पुणे किंवा मुंबईहून शक्य तितक्या लवकर कर्जत स्थानक गाठायचे. तिथून पूर्व बाजूच्या एसटी स्टँडहून आंबिवलीसाठी एसटी पकडायची. नेरळहूनही कशेळे व कशेळेहून आंबिवलीसाठी एसटी मिळू शकते. आंबिवलीहून बऱ्यापकी मळलेली वाट गडाकडे निघते. झरे, धबधबे, पठार आणि सभोवताली नजरबंदी करणारा हिरवागार मुलुख बघत दीड-दोन तासांत गडावर पोहोचायचे. पुढे आजूबाजूचा समां आणि आपण! परतीच्या प्रवासात वेळ हाताशी असेल तर आंबिवली गावातल्या लेण्यांना भेट द्यायची. या भागात एसटीच्या वेळा पाळणे अधिक महत्त्वाचे आहे.

    • 6/13

      लोणावळ्याहून सहारा अँबी व्हॅलीकडे जाताना अंदाजे तीसेक किमीवर पेठ शहापूर नावाचे गाव आहे. त्या गावामागचा गड म्हणजेच कोरीगड किंवा कोरईगड. कमी उंच, पायऱ्यांची सोय आणि फिरायलाही कमी अशा सर्व ‘सुविधां’मुळे कोरईगड पर्यटकांचा आवडता आहे. कधी गेलात तर सर्व ती काळजी घेऊन तटबंदीच्या काठाकाठाने गड-प्रदक्षिणा करायला विसरू नका!

    • 7/13

      कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जिल्हातील अकोले तालुक्यात असणाऱ्या सह्याद्री पर्वत रांगेत आहे. याचि उंची सुमारे १६४६ मीटर आहे. शिखरापर्यंत पोहचण्यासाठी ट्रेकिंग मार्ग आणि पादचारी रस्ते आहेत. शिखरावर जाण्याचा मुख्य रस्ता भंडारदऱ्यापासून ६ कि. मी. असणाऱ्या बारी या गावापासून सुरु होतो. नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी -भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. इगतपुरी मधुन पहाटे ५.०० वाजता बारी तसेच पुण्याच्या दिशेने वाहने जातात. ह्या प्रवासाला तीन तासांचा अवधी लागतो. बारी गावातून थोडे अंतर गेल्यावर श्री हनुमानाचे मंदिर येते. या हनुमान मंदिरापाठीमागून जाणाऱ्या मार्गाने यात्री शिखरापर्यंत जाण्याचा मार्ग सुरु होतो. चढाईतील काही भाग वगळता बाकीचा रस्ता चढण्यास सोपा आहे.

    • 8/13

      किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन दिसतो. प्रबळगड ऊर्फ मुरंजन हा किल्ला त्याच्या शेजारी असलेल्या कलावंतीण सुळक्यामुळे सहज ओळखता येतो. रायगड जिल्ह्य़ातील पनवेल तालुक्यात हा गड येतो. याची पायथ्यापासून उंची ४५० मीटर आहे. किल्ल्यावर फक्त पावसाळ्यात पाणी असते, इतर ऋतूत गडावर पाणी नसते. गडाच्या माथ्यावरून पूर्वेला पेबचा किल्ला आणि माथेरानचे पठार दिसते. पश्चिमेला पनवेल शहर तर उत्तरेला गाढेश्वर तलाव असून दक्षिणेला इर्शाळगड आणि पाताळगंगा नदी दिसते. गडावर राहण्याची व्यवस्था नाही.

    • 9/13

      भिमाशंकरला रस्त्याने जायला पुणेनगर रस्त्यावरच्या मंचरला फाटा आहे. मंुबईहून हे अंतर अडीचशे-पावणेतीनशे किमी एवढं आहे. पुण्याहून भिमाशंकर १६८ किमी आहे. मंुबईहून जायला दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे कल्याणनगर रस्त्याने मुरबाड , माळशेज घाट पार करत आळेफाटा गाठायचं. पुढे पुण्याच्या दिशेला असलेल्या नारायणगाव मागेर् मंचरला वळायचं. दुसरा मार्ग म्हणजे मुंबई-पुणे मार्गावरील लोणावळा ओलांडून तळेगावहून आतल्या रस्त्याने राजगुरूनगर मागेर् मंचर गाठायचं. मंचर-भिमाशंकर हे अंतर साधारण ७० किमी असून मार्ग दाट जंगलाचा व निर्जन आहे. पावसाळ्यात या भागात प्रचंड धुकं असतं.

Web Title: Monsoon trekking destinations near mumbai that should be on every trekkers list

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.