-

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्रकिनारी अडकून पडलेल्या व्हेल माश्याला जिवदान देण्याचे रायगड जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असफल ठरले आहेत. महाकाय माश्याला समुद्रात लोटण्यात अपयश आल्याने या माश्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
-
जिल्हा प्रशासनाने पोलीस , वनविभाग आणि स्थानिकांच्या मदतीने किनार्यावरच त्याला खोल खड्डयात पुरून त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत.
-
18 ते 20 टन वजनाचा हा मासा 40 फुट लांबीचा अतिशय दुर्मिळ असा मासा पाहण्याची संधी परिसरातील नागरीकांना मिळाली. असा मासा यापूर्वी कधीच पाहिला नव्हता असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
-
जखमी अवस्थेतील या माशाला वाचविण्यासाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी त्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. त्यानंतर या माशाला खोल समुद्रात पुन्हा ढकलण्यासाठी नौदल आणि पोलीस यंत्रणेला पाचारण करण्यात आले.
-
या माशाला रेवदंडा किनार्यावरच पुरण्यात आले.. त्यासाठी 42 फुट लांबीचा 8 फूट खोल खड्डा खणण्यात आला असून जेसीबीच्या सहाय्याने माश्याचा मृतदेह या खड्ड्यात टाकण्यात आला.
-
त्यांचे रात्रभर प्रयत्न सुरू होते. अजस्त्र माश्याला उचलून समुद्रात लोटण्याचे सर्व प्रयत्न असफल ठरले. त्यामुळे पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास तो मरण पावला. वनविभागाच्या अधिकार्यांनी पंचनाम्याचे काम पूर्ण केले .
अखेर त्या माश्याचा दुर्दैवी मृत्यू
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्रकिनारी अडकून पडलेल्या व्हेल माश्याला जिवदान देण्याचे रायगड जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असफल ठरले आहेत. महाकाय माश्याला समुद्रात लोटण्यात अपयश आल्याने या माश्याचा दुर्दैवी मृत्यू झाला
Web Title: 42 feet blue whale died at alibaug coast