
अष्टपैलू खेळाडू झुलन गोस्वामीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात १७ धावांनी विजय मिळवला. विजयाचा आनंद साजरा करताना भारतीय महिला क्रिकेट संघ. (छायाः पीटीआय) बॉलीवूडमधील चर्चित जोडी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीला उपस्थित होते. (छायाः पीटीआय) जयगड बंदर जोडण्यासाठी जेएसडब्ल्यू आणि कोकण रेल्वे महामंडळ यांच्यात रविवारी सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी जेएसडब्ल्यू समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते. (छायाः गणेश शिर्सेकर) सिंहगड रस्त्यावरील सहा सोसायटय़ांच्या पार्किंगमध्ये लावलेली तब्बल ९० वाहने जाळून टाकण्याचा धक्कादायक प्रकार रविवारी पहाटे घडला. (छायाः लोकसत्ता) राजस्थान येथील अजीगड येथे तब्बल ५० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या सात वर्षीय मुलीला बाहेर काढण्यात ३० तासांनंतर यश आले. या चिमुरडीवर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. (छायाः पीटीआय) -
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे दुधाचा टँकर पालथा होऊन त्यात हजारो लिटर दूध सांडले गेले. हे दूध नेण्यासाठी स्थानिक रहिवाश्यांची अशी धडपड पाहावयास मिळाली.
२९ जून २०१५
Web Title: 29 june