-

मद्यपान करून वाहन चालवू नये असा सूचक इशारा देण्यासाठी गोरेगाव फिल्मसिटी रोड येथे एका छोटेखानी उपक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील ५० रिक्षाचालक या उपक्रमात सहभागी झाले होते.
शटर सिनेमाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात अभिनेता सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, दिग्दर्शक वी.के. प्रकाश उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुंबईतील रिक्षाचालकांशी संवाद साधला. मुंबईकरांच्या सेवेत तत्पर असणारे रिक्षाचालक तितकेच प्रामाणिक आहेत आणि काही मोजक्या रिक्षाचालकांच्या चुकीमुळे आपण त्यांच्याबाबतीत पूर्वग्रह मनात ठेवू नये असे मत अमेय वाघ याने व्यक्त केले. अमेयने स्वतः सिनेमात रिक्षा चालकाची भूमिका केली असून त्याच्याकडून झालेल्या चुकीमुळे घडणाऱ्या गोष्टीवर सिनेमाची कथा बेतलेली आहे. यावेळी सचिन खेडेकर यांनी ३१ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या शटर सिनेमा आवर्जून पाहावा यासाठी विशेष आमंत्रण दिले.
मुंबईतील रिक्षा चालकांसोबत ‘शटर’ची टिम
मद्यपान करून वाहन चालवू नये असा सूचक इशारा देण्यासाठी गोरेगाव फिल्मसिटी रोड येथे एका छोटेखानी उपक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील ५० रिक्षाचालक या उपक्रमात सहभागी झाले होते.
Web Title: Shutter movie team with mumbai rikshawala