रेस अक्रॉस अमेरिका (रॅम) ही जगातील सर्वात कठीण सायकल शर्यत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात नाशिकचे महेंद्र व हितेंद्र महाजन हे डॉक्टर बंधू यशस्वी ठरले आहेत. महाजन बंधूंनी आठ दिवस १४ तास आणि ५५ मिनिटांत ही शर्यत पूर्ण केली. (छायाः पीटीआय) -
अमेरिकेतील अतिशय अवघड, धाडसी व प्रतिष्ठेची समजली जाणारी’रेस अॅक्रॉस अमेरिका’ अर्थात रॅम ही सायकल स्पर्धा नाशिकच्या डॉ. हितेंद्र महाजन आणि डॉ. महेंद्र महाजन यांनी आठ दिवस १४ तासात पूर्ण करून हे अंतर पूर्ण करणारे पहिले भारतीय होण्याचा मान मिळविला.
-
त्यांना ४८०० किलोमीटरचे अंतर नऊ दिवसात पूर्ण करावयाचे होते. त्यांच्या यशाचा आनंदोत्सव सोमवारी नाशिकच्या सायकलस्वारांनी जल्लोषात साजरा केला.
-
कृषीनगरच्या जॉगिंग ट्रॅकवर नाशिक सायक्लिस्टच्या सदस्यांनी गुलाल उधळून पेढेही वाटले आणि महाजन यांच्या घरी जाऊन महाजन कुटुंबियांचे अभिनंदन केले.
-
डॉ. महाजन बंधुंनी सहभाग घेतलेली ही स्पर्धा मानसिक व शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी आहे.
-
या स्पर्धेत जवळपास माउंट एव्हरेस्टच्या तीनपट चढाईइतके अंतर मार्गक्रमण करावे लागते.
-
मेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व किनाऱ्यापर्यंत साधारणत: ४८०० किलोमीटरचे अंतर सायकलद्वारे त्यांनी पूर्ण केले.
-
मागील ३४ वर्षांपासून अमेरिकेत आयोजित केली जाणाऱ्या या स्पर्धेची अतिशय अवघड अशी ओळख आहे.
-
-
स्पर्धेत १३० संघांनी सहभाग नोंदविला होता.
-
-
‘रेस अॅक्रॉस अमेरिका’वर तिरंगा
अमेरिकेतील अतिशय अवघड, धाडसी व प्रतिष्ठेची समजली जाणारी’रेस अॅक्रॉस अमेरिका’ अर्थात रॅम ही सायकल स्पर्धा नाशिकच्या डॉ. हितेंद्र महाजन आणि डॉ. महेंद्र महाजन यांनी आठ दिवस १४ तासात पूर्ण करून हे अंतर पूर्ण करणारे पहिले भारतीय होण्याचा मान मिळविला.
Web Title: Nashik doctors to become first indians to complete race across america