
तुम्हाला स्वत:च्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ द्यायचे नसतील किंवा त्वचेची तकाकी कायम ठेवायची असेल तर आहारात काही पथ्ये पाळणे अत्यंत गरजेचे आहे. चांगल्या त्वचेसाठी दुधाचे किंवा साखरेचे पदार्थ टाळण्याची गरज असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. -
दूध, आईस्क्रीम, चीज, दही यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये हार्मोन्स मोठ्याप्रमाणावर असतात. त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येणे किंवा सुरकुत्या पडणे अशा समस्या जाणवण्याची शक्यता असते.
-
मोठ्याप्रमाणावर जंक फुडचे सेवन केल्यास त्वचेसह पूर्ण शरीरावरच त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.
-
मोठ्याप्रमाणावर साखर असलेले चॉकलेटसारखे पदार्थ त्वचेचे तारूण्य कायम राखणाऱ्या शरीरातील घटकांवर विपरीत परिणाम करतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडण्याचे प्रमाण वाढते.
-
पास्तासारख्या पदार्थांमध्ये वापरण्यात येणारा मैदा किंवा कॉर्न स्टार्च शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम करू शकतात. हे पदार्थ चवीला चांगले असले तरी या पदार्थांमध्ये कोणतेही पोषणमुल्य नसते. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी शक्यतो हे पदार्थ टाळावेत असा सल्ला डॉक्टर्स देतात.
त्वचा चांगली ठेवण्यासाठी काय खाणे टाळाल?
Web Title: What not to eat for gorgeous skin