
इमरान खान आणि कंगना रणावत यांच्या आगामी ‘कट्टी बट्टी’ चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचेच लक्ष वेधले. इमरानच्या चाहत्या वर्गाला त्याच्या भूमिकेतील विविध छटा पाहावयास मिळतील. तर बघूया कशाप्रकारच्या त्याच्या या चित्रपटातील भूमिका असतील. डिझाइन स्टुडन्टः या छायाचित्रात डिझाइनर स्टुन्टकडे असते तशी ‘टी-स्केल’ पकडलेला इमरान दिसतो. या स्केलचे नाव माधव काब्रा असे त्यावर लिहलेले आहे. लव्हर बॉयः एका प्रेमीकाच्या भूमिकेत इमरान या चित्रपटात दिसेल. मॅडी (इमरान खान) हा पायलच्या (कंगना रणावत) प्रेमात अगदी वेडा होतो. या दोघांमध्ये केवळ टाइमपास म्हणून प्रेमास सुरुवात होते. क्रिकेट चाहताः इमरान खान यात बहुदा क्रिकेटचा चाहता असल्याचे दिसते. फुटबॉल फॅनः जरी ट्रेलरमध्ये इमरान कुठेही फुटबॉल खेळताना दिसत नसला तरी तो मॅनचेस्टर युनायटेड क्लबचा उत्साही चाहता यात आहे. कुकींगचा आनंदः या चित्रपटातील इमरानच्या भूमिकेस स्वयंपाक करावयास खूप आवडतो.
‘कट्टी बट्टी’ चित्रपटातील इमरानच्या विविध छटा
इमरान खान आणि कंगना रणावत यांच्या आगामी ‘कट्टी बट्टी’ चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचेच लक्ष वेधले. इमरानच्या चाहत्या वर्गाला त्याच्या भूमिकेतील विविध छटा पाहावयास मिळतील. तर बघूया कशाप्रकारच्या त्याच्या या चित्रपटातील भूमिका असतील.
Web Title: Shades of imran khan in katti batti