
‘इंटरनेट साथी’ सारथ्य करणार असलेल्या सायकलसह रतन टाटा. (छायाः वसंत प्रभू) हाजी हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत केंद्रीय अल्पसंख्यांक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी, अभिनेता रमिझ राजा मुराज आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते. (छायाः पीटीआय) तेलंगणातील वाढत्या अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी राव यांच्या दिमतीला तब्बल ५ कोटी रूपये किंमतीची व्हॅनिटी बस तैनात करण्यात आली आहे. (छायाः पीटीआय) दिल्लीतील जनकपुरी येथे सुरु असलेल्या वार्षिक आंबा महोत्सव २०१५मध्ये आंब्याचा आनंद घेताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोडिया. (छायाः पीटीआय) कौटुंबिक वादातून हत्या करण्यात आलेल्या शिला फ्रान्सिस्को वाझ या आठ वर्षीय चिमुरडीला तिच्या शाळेतील मैत्रिणींनी श्रद्धांजली वाहिली. (छायाः पीटीआय) विंबल्डन टेनिस स्पर्धेत तिसऱ्या फेरीत विजय मिळविल्यानंतर आनंद व्यक्त करताना अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स. (छायाः पीटीआय) म्हैसूर येथील नागराहोल नॅशनल पार्क येथे भूक भागविण्यासाठी हरणांवर हल्ला करताना वाघ. (छायाः पीटीआय)
४ जुलै २०१५
Web Title: 4 july