• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 10 july

१० जुलै २०१५

Updated: October 7, 2021 10:46 IST
Follow Us
    • फिलिपाइन्समध्ये चान-होम चक्रीवादळाने कहर मांडला आहे. मनिलाच्या उत्तरेचा भाग जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
    • तडाखेबंद खेळाच्या जोरावर गार्बिनने अ‍ॅग्निझेस्का रडवानस्कावर मात करत विम्बल्डन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीत गार्बिनसमोर बलाढय़ सेरेनाचे आव्हान असणार आहे. (छायाः पीटीआय)
    • सोसायटी मासिकाच्या अंकावरील मुखपृष्ठाचे प्रकाशन करताना बॉलिवूड अभिनेता शत्रूघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी अभिनेत्री पूनम. (छायाः पीटीआय)
    • आयएसएलच्या दुसऱ्या सत्रासाठी शुक्रवारी भारतीय खेळाडूंचा लिलाव मुंबईत होणार आहे. या लिलावात भारताचा सर्वात यशस्वी फुटबॉलपटू सुनील छेत्रीला आपल्या चमूत घेण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. (छायाः केव्हिन डिसोझा)
    • ‘माउली-माउली’ असा अखंड घोष.. वैष्णवांकडून होणारा भक्तिकल्लोळ अन् उत्साही व वैभवी सोहळ्याने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलीच्या पालखीने श्रीक्षेत्र आळंदीतून गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. (छायाः राजेश स्टीफन)
    • ‘मेक इन इंडिया’ ध्यासातून साधल्या गेलेल्या ९० टक्क्य़ांहून अधिक सुटय़ा भागांच्या देशांतर्गत (लोकलाइज्ड) निर्मितीतून गुरुवारी मुंबईत अनावरण करण्यात आलेली नवीन होंडा जॅझ किमतीत घटीसह प्रस्तुत झाली. होंडा कार्स इंडिया प्रा. लि.चे अध्यक्ष व मुख्याधिकारी कास्तुशी इनू यांनी अनावरणप्रसंगी नवीन जॅझसाठी ३ लाख कारच्या विक्रीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित केले आहे. होंडाच्या यापूर्वी अस्तित्वात असलेल्या जॅझच्या केवळ २३,०००च्या घरात विक्री झाली आहे. नवीन १.२ लिटर आय-व्हिटेक इंजिन असलेली पेट्रोल इंधन प्रकारातील जॅझची नवी मुंबईत एक्स-शोरूम किंमत ५,३०,९०० रुपये इतकी असून, ऑटो गियर शिफ्ट असलेली जॅझ थोडी महाग ७.८५ लाख रुपये किमतीत उपलब्ध झाली आहे. डिझेल प्रकारातही ही कार उपलब्ध आहे. (छाया : दिलीप कागडा)

Web Title: 10 july

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.