-

विधान भवनाच्या पायऱयांवर बसून विरोधकांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला. त्याचबरोबर टाळ वाजवूनही विरोधकांनी सत्ताधाऱयांचे लक्ष वेधून घेतले. (छाया – प्रशांत नाडकर)
-
विधान भवनाच्या पायऱयांवर बसून विरोधकांनी शेतक-यांच्या कर्जमाफीची मागणी लावून धरत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची वाट अडवून धरली. (छाया – प्रशांत नाडकर)
-
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे बुधवारीही दगडफेक करण्यात आल्यामुळे वातावरण तणावपूर्ण आहे. पोलीसांनी गावात कडेकोट बंदोबस्त ठेवला असला, तरी संतप्त जमावाकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या दगडफेकीमध्ये १८ पोलीस जखमी झाले आहेत. (छाया – दीपक जोशी)
-
आदित्य ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विधिमंडळातील दालनात भेट घेऊन राज्यातील सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकांना पर्याय म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या ‘टॅब’चे सादरीकरण केले. (छाया – प्रशांत नाडकर)
-
सलमानच्या हस्ते बुधवारी ‘हिरो’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. आदित्य पांचोली यांचा मुलगा सूरज पांचोली आणि अभिनेता सुनिल शेट्टी यांची कन्या अथिया शेट्टी हिरोच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहेत. (छाया-दिलीप कागडा)
-
मुंबई काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीमध्ये मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, गुलाम नबी आझाद, आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सेल्फी घेऊन आपली एकजूट कॅमेऱयामध्ये कैद केली. (छाया – प्रशांत नाडकर)
-
‘सोमय्या रोबो फेस्टीव्हल २०१५’ मध्ये मुंबई आणि ग्रामिण भागातील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. (छाया-प्रदीप दास)
१६ जुलै २०१५
Web Title: 16 july