-

‘लोकसत्ता शागीर्द’च्या पहिल्या पर्वात या दोन गुरुंनी निवडलेल्या त्यांच्या शिष्यांनी जाहीर मंचावर प्रथमच आपली कला सादर केली. (छाया -दिलीप कागडा)
तब्बल पाच हजार वर्षांची परंपरा असलेल्या भारतीय शास्त्रीय संगीतात गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिष्याने गुरुच्या पायाशी बसून संगीतसाधना करावी आणि गुरुने केवळ सुरांचेच नाही, तर त्यामागच्या तत्त्वज्ञानाचेही ज्ञान शिष्याला द्यावे, हे गेली अनेक शतके चालत आले आहेत. भारतीय शास्त्रीय संगीतातील दोन दिग्गज गुरू म्हणजे गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आणि पं. शिवकुमार शर्मा! (छाया -दिलीप कागडा) -
दुसऱ्या सत्रात मुसळधार पावसालाच जणू आव्हान देण्यासाठी गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या शिष्या आणि जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका तेजश्री आमोणकर यांनी गौड मल्हार रागातील ‘पापी दादुरवा बुलाए’ ही बंदिश सादर केली. (छाया -दिलीप कागडा)
-
शेखर आणि ताकाहिरो यांच्या जुगलबंदीने टाळ्यांचा पाऊस पाडला. शेवटी अत्यंत सुंदर तिहाई सादर करत ताकाहिरो यांनी यमन रागाची सांगता केली. (छाया -दिलीप कागडा)
-
शेखर गांधी यांच्या तबला साथीवर ताकाहिरो अराई यांनी संतूर या अत्यंत मोहक आणि तेवढय़ाच कठीण वाद्यावर यमन राग आळवला. कोमल गंधार आणि आरोहात पंचम वज्र्य असलेल्या या रागाचा कशिदा संतूरवर विणला जात होता आणि रसिक प्रेक्षकांचे भान हरपले. (छाया -दिलीप कागडा)
-
गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आणि पं. शिवकुमार शर्मा यांचा सन्मान करताना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि पृथ्वी एडिफिसचे व्यवस्थापकीय संचालक अभय केळे. (छाया -दिलीप कागडा)
-
पृथ्वी एडिफिस प्रस्तुत लोकसत्ता आयोजित ‘शागीर्द’ या अनोख्या मफिलीत या तरुण कलावंतांच्या सुरेल सादरीकरणाला मुंबईकर रसिकांची मनसोक्त दाद मिळाली. (छाया -दिलीप कागडा)
वाह शागीर्द!
Web Title: Loksatta shageerd